रसायन आणि खते मंत्रालय
परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार 25000 जन औषधी केंद्रे उघडणार
“जन औषधी केंद्रांनी देशातील मध्यमवर्गीयांची 20,000 कोटी रुपयांची बचत करून नवीन बळ दिले आहे. ”
"जन औषधी केंद्रांची संख्या 25,000 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे"
Posted On:
15 AUG 2023 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सांगितले की 'जन औषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
जनऔषधी केंद्रांनी विशेष मध्यमवर्गीयांना नवे बळ दिले आहे असे ते म्हणाले. एखाद्याला मधुमेहाचे निदान झाल्यास महिन्याला 3000 रुपये इतका औषधांचा खर्च येतो. जन औषधी केंद्रांमार्फत 100 रुपये किमतीची औषधे आम्ही 10 ते 15 रुपयांना देत आहोत,” असे ते म्हणाले.
पारंपारिक कौशल्ये असणाऱ्यांसाठी सरकार पुढील महिन्यात 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे. ते म्हणाले की सरकार 'जन औषधी केंद्र' (अनुदानित औषध दुकाने) ची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न करत आहे.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949053)
Visitor Counter : 141