संरक्षण मंत्रालय
सत्त्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून एक राष्ट्रपती तटरक्षक पदक आणि भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाच तटरक्षक पदके देण्यास मंजुरी
Posted On:
14 AUG 2023 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु,यांनी 2023 च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय तटरक्षक दलाच्या खालील जवानांना त्यांच्या विशेष शौर्य, कर्तव्याविषयी अपूर्व निष्ठा आणि विशिष्ट कामगिरीसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्याबद्दल एक राष्ट्रपती तटरक्षक पदक (पीटीएम) आणि पाच तटरक्षक पदके (टीएम) देण्यास मंजूरी दिली आहे. पुरस्कार विजेत्यांची तपशीलवार यादी खालीलप्रमाणे आहे:
- राष्ट्रपती तटरक्षक पदक (विशिष्ट सेवा)
- आयजी मनोज वसंत बाडकर, TM (0173-Q)
- कमांडंट (जे जी) अनुराग शुक्ला (0853-M)
- सुलतान सिंग, P/Nvk(P), 12405-T
- तटरक्षक पदक (गुणवंत सेवा)
- डीआयजी मनोज भाटिया (0323-जे)
- डीआयजी के आर दीपक कुमार (0434-एल)
- देवब्रत कुमार मिश्रा, P/Adh(RP), 00486-L
भारतीय तटरक्षक जवानांना 26 जानेवारी 1990 पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात.
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1948722)
Visitor Counter : 125