युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
बाकू येथे होणाऱ्या आयएसएसएफ नेमबाजी जागतिक स्पर्धेसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 34 भारतीय नेमबाजांना दिला निधी
34 पैकी 31 खेळाडू टॉप्स किंवा खेलो इंडिया योजनेचे लाभार्थी
Posted On:
14 AUG 2023 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
अझरबैजानमधील बाकू येथे होणार्या आगामी आयएसएसएफ नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीच्या सदस्यांना युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS) निधी देण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 34 भारतीय नेमबाज सहभागी होत आहेत. ज्यामध्ये 17 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नेमबाजी संघाच्या 57 सदस्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. 34 नेमबाज, 15 प्रशिक्षक आणि उच्च कार्यप्रदर्शन संचालकांसह सहाय्यक कर्मचारी गटाचे 8 सदस्य यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

संघाच्या बोर्डिंग/ लॉजिंग खर्च, विमानभाडे, व्हिसा खर्च आणि भत्ता (OPA) हे खर्च MYAS प्रशिक्षण आणि स्पर्धेची वार्षिक दिनदर्शिका (ACTC) या योजनेंतर्गत भागवले जाणार आहेत. या जागतिक स्पर्धेत भाग घेणार्या 34 नेमबाजांपैकी 24 टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचे (टॉप्स) लाभार्थी तर 7 खेलो इंडिया क्रीडापटू आहेत.
ही जागतिक स्पर्धा 14 ऑगस्ट 2023 रोजी सुरू होईल आणि 1 सप्टेंबर 2023 रोजी तिचा समारोप होईल. पॅरिस ऑलिम्पिक वर्षात सहभाग मिळवण्याकरिता भारतासाठी ही प्रतिष्ठित स्पर्धा महत्त्वाची आहे, कारण 15 स्पर्धांमध्ये एकूण 48 ऑलिम्पिक कोटा राखीव ठेवण्यात आले आहेत. आयएसएसएफ च्या 2022 त्या आवृत्तीत नेमबाजी जागतिक स्पर्धेत भारताने 12 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह 34 पदके जिंकली होती आणि पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते. या स्पर्धेच्या पदकतालिकेत चीन अव्वल स्थानावर होता.
34 Indian shooters who will be competing at the event are -
1 DIVYANSH SINGH PANWAR - TOPS Athlete
2 RAMITA - TOPS Athlete
3 AISHWARY PRATAP SINGH TOMAR - TOPS Athlete
4 MEHULI GHOSH - TOPS Athlete
5 HRIDAY HAZARIKA - TOPS Athlete
6 TOILOTTAMA SEN - TOPS Athlete
7 AKHIL SHEORAN - TOPS Athlete
8 SIFT KAUR SAMRA - TOPS Athlete
9 NIRAJ KUMAR - TOPS Athlete
10 ASHI CHOUKSEY - TOPS Athlete
11 SARABJOT SINGH - TOPS Athlete
12 MANINI KAUSHIK - TOPS Athlete
13 SHIVA NARWAL - TOPS Athlete
14 DIVYA T.S - TOPS Athlete
15 ARJUN SINGH CHEEMA - TOPS Athlete
16 ESHA SINGH - TOPS Athlete
17 ANISH - TOPS Athlete
18 PALAK - Khelo India Athlete
19 VIJAYVEER SIDHU - TOPS Athlete
20 RHYTHM SANGWAN - TOPS Athlete
21 ADARSH SINGH - TOPS Athlete
22 MANU BHAKER - TOPS Athlete
23 PRITHVIRAJ TONDAIMAN
24 MANISHA KEER - Khelo India Athlete
25 KYNAN CHENAI - Khelo India Athlete
26 PREETI RAJAK - Khelo India Athlete
27 ZORAVAR SINGH SANDHU
28 RAJESHWARI KUMAR
29 ANANTJEET SINGH NARUKA - Khelo India Athlete
30 GANEMAT SEKHON - TOPS Athlete
31 ANGADVIR SINGH BAJWA
32 PARINAAZ DHALIWAL - Khelo India Athlete
33 GURJOAT SINGH KHANGURA - TOPS Athlete
34 DARSHANA RATHORE - Khelo India Athlete
* * *
S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1948632)
Visitor Counter : 186