वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जुलै 2023 साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक जुलै 2022 च्या तुलनेत (-) 1.36% वर ,खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे घसरण


जुलै 2023 (आधार वर्ष: 2011-12) साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक

Posted On: 14 AUG 2023 12:00PM by PIB Mumbai

 

जुलै, 2023 महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर जून, 2023 मधील (-) 4.12% च्या तुलनेत 1.36% (तात्पुरता) इतका आहे. जुलै 2023 मध्ये महागाई दरातील घसरणीला प्रामुख्याने खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड तसेच खाद्यपदार्थांच्या कमी झालेल्या किमती कारणीभूत आहेत. सर्व वस्तू आणि घाऊक किंमत निर्देशांक घटकांचे मागील तीन महिन्यांचे निर्देशांक आणि महागाई दर खाली दिले आहेत:

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %)*

All Commodities/Major Groups

Weight (%)

May-23 (F)

June-23 (P)

July-23 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.0

149.4

-3.61

149.0

-4.12

151.9

-1.36

I. Primary Articles

22.62

175.1

-1.90

176.3

-2.87

190.5

7.57

II. Fuel & Power

13.15

148.6

-9.17

146.0

-12.63

145.3

-12.79

III. Manufactured Products

64.23

140.6

-3.03

140.0

-2.71

139.6

-2.51

Food Index

24.38

172.9

-1.54

175.2

-1.24

187.7

7.75\

 

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Feb-23

Mar-23

Apr-23

May-23

Jun-23 (P)

Jul-23 (P)

All Commodities

100.0

0.13

0.07

0.07

-1.13

-0.27

1.95

I. Primary Articles

22.62

-0.40

0.92

1.48

-1.52

0.69

8.05

II. Fuel & Power

13.15

1.29

-0.76

-2.37

-2.69

-1.75

-0.48

III. Manufactured Products

64.23

0.14

-0.21

0.07

-0.57

-0.43

-0.29

Food Index

24.38

-0.12

0.47

1.10

-0.63

1.33

7.13

 

घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकाच्या प्रमुख गटांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये झालेला बदल:-

  1. प्राथमिक वस्तू (भार 22.62 टक्के):- या प्रमुख गटाच्या निर्देशांकात जून 2023 मधील 176.3 (तात्पुरत्या) च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये 8.05% वाढ होऊन तो 190.5 (तात्पुरता) झाला. जून 2023 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये अन्नपदार्थांच्या किमती (10.55%) कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (4.40%) आणि बिगर-अन्नपदार्थांच्या किमती (2.27%) वाढल्या. जून 2023 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये खनिजांच्या (-3.17%) किमतीमध्ये घट झाली.
  2. इंधन आणि उर्जा (भार 13.15%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक जून 2023 मधील 146.0 (तात्पुरता ) वरून जुलै 2023 मध्ये 0.48% ने घसरून 145.3 (तात्पुरता) झाला आहे. जून 2023 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये कोळशाच्या किमतीत (0.07%) वाढ झाली. जून, 2023 च्या तुलनेत जुलै, 2023 मध्ये वीज (-0.45%) आणि खनिज तेल (-0.65%) यांच्या किंमती कमी झाल्या.
  3. उत्पादित उत्पादने (भार 64.23%):- या प्रमुख गटाचा निर्देशांक जून 2023 मधील 140.0 (तात्पुरता ) वरून जुलै, 2023 मध्ये 0.29% घसरून 139.6 (तात्पुरता) वर आला आहे. उत्पादित वस्तूंच्या 22 एनआयसी दोन अंकी गटांपैकी, 11 गटांच्या किमतीत वाढ झाली आहे, तर 10 गटांच्या किमतीत घट झाली आहे. किमतीमधील वाढ प्रामुख्याने अन्नपदार्थ, यंत्रसामग्री आणि उपकरणे; संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादने; इतर बिगर-धातू खनिज उत्पादने आणि विद्युत उपकरणे यामुळे झाली आहे. जून, 2023 च्या तुलनेत जुलै, 2023 मध्ये काही गटांच्या किमतीत घट दिसून आली. ते पुढीलप्रमाणे - मूलभूत धातू ; रसायने आणि रासायनिक उत्पादने; कापड; इतर उत्पादन; कागद आणि कागद उत्पादने.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्यान्न निर्देशांक (वजन 24.38%): प्राथमिक वस्तू गटातील 'अन्न वस्तू ' आणि उत्पादित उत्पादने गटातील 'अन्न उत्पादन' यांचा समावेश असलेला अन्न निर्देशांक जून 2023 मधील 187.7 वरून जुलै, 2023 मध्ये 175.2 पर्यंत वाढला आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जून, 2023 मधील (-) 1.24% वरून जुलै 2023 मध्ये 7.75% झाला.

मे, 2023 महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधार वर्ष: 2011-12=100): मे 2023 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि 'सर्व वस्तू 'साठी महागाई दर (आधार: 2011-12=100) अनुक्रमे 149.4 आणि (-)3.61% इतका राहिला. अद्ययावत आकडेवारीवर आधारित विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर (Y-o-Y) परिशिष्ट II मध्ये दिला आहे. मागील सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट III मध्ये दिला आहे.

प्रतिसाद दर: जुलै 2023 साठी घाऊक किंमत निर्देशांक 85.2 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित केला आहे, तर मे 2023 साठी अंतिम आकडेवारी 94.4 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या अंतिम दुरुस्ती धोरणानुसार निर्देशांकाच्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल. हे प्रसिद्धिपत्रक, निर्देशांक आणि चलनवाढ आकडेवारी आमच्या http://eaindustry.nic.in या होमपेजवर उपलब्ध आहेत.

प्रसिद्धीपत्रकाची पुढील तारीख: ऑगस्ट 2023 महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक 14/09/2023 रोजी प्रसिद्ध होईल.

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948481) Visitor Counter : 308