सांस्कृतिक मंत्रालय

वाढत्या जनभागीदारीमुळेच "हर घर तिरंगा" अभियानाचे रूपांतर लोकचळवळीत झाले : गोविंद मोहन


दररोज लाखो लोक तिरंगा ध्वजासोबतचे आपले 'सेल्फी' अपलोड करत आहेत

Posted On: 12 AUG 2023 3:49PM by PIB Mumbai

 

केंद्र  सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा अभियान साजरे करणार आहे. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि  एकत्रित सहभाग आणि जनभागीदारी वाढवून आझादी का अमृत महोत्सव साजरा करणे ही यामागची संकल्पना आहे. संस्कृती सचिव गोविंद मोहन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामध्ये जन-भागीदारी वाढून या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर झाले आहे. यावर्षी देशाच्या विविध भागांत तिरंगा रॅली काढण्यात येत असून त्यात मोठा लोकसहभाग पाहायला मिळत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, या वर्षीच्या राष्ट्रीय स्तरावरील तिरंगा बाईक रॅलीला 11 ऑगस्ट रोजी भारत मंडपम (प्रगती मैदान, नवी दिल्ली) येथून सुरुवात झाली असून यामध्ये संसद सदस्यांनी हर घर तिरंगा मोहिमेत भाग घेतला.

सांस्कृतिक कार्य सचिव गोविंद म्हणाले की, दररोज लाखो लोक तिरंगा ध्वजासोबतचे आपले सेल्फी अपलोड करत आहेत.  या सेल्फीसह, लोक मेरी माटी मेरा देश मोहिमेत देखील सहभागी होत आहेत, जिच्या माध्यमातून देशातील शूरवीरांचे स्मरण म्हणून महत्त्वाच्या अनेक ठिकाणी शिलाफलक उभारले जात आहेत. प्रत्येकजण तिरंगा सोबतचा सेल्फी अपलोड करून हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, टपाल विभाग लोकांना उच्च-गुणवत्तेच्या राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यासाठी नियुक्त संस्था म्हणून काम करत आहे. 12 ऑगस्ट रात्री 11:59 वाजेपर्यंत https://www.epostoffice.gov.in/  या संकेतस्थळावरून ऑनलाइन ध्वज खरेदी करता येतील.

अभियाना संदर्भात अधिक माहिती देताना,गोविंद मोहन यांनी सांगितले की, टपाल विभागाने यावर्षी 2.5 कोटी ध्वजांची मागणी केली आहे आणि 55 लाख ध्वज टपाल कार्यालयामधून याआधीच वितरित करण्यात आले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने यापूर्वीच राज्यांना 1.3 कोटी ध्वज पाठवले आहेत, असा खुलासाही त्यांनी केला. देशातल्या विविध राज्यांमधून देखील स्वयं- सहाय्यता गटांच्या माध्यमातून कोट्यवधी ध्वजांची निर्मिती केली जात आहेज्याच्या माध्यमातून ध्वज निर्मितीत आत्मनिर्भतेचे दर्शन घडत आहे.

या वर्षी संस्कृती मंत्रालयाने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत आत्तापर्यंत 2000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती गोविंद मोहन यांनी यावेळी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या विभागीय सांस्कृतिक केंद्रांच्या माध्यमातून नुक्कड नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेषतः आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होण्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर संदेशही वाजवले जात आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. मन की बातच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये, पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' अभियान  सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे, ज्याला गेल्या वर्षी प्रचंड यश मिळाले होते आणि मोठी जन भागिदारी पाहायला मिळाली होती. या अभियानात सहभागी होण्यासाठी तिरंगा  सोबतच आपला सेल्फी https://harghartiranga.com  या संकेतस्थळावर अपलोड करता येईल.

नागरिकhttps://merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावरून मेरी माटी मेरा देश मोहिमेत आपला सहभाग नोंदवता येईल.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948229) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu