कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

भारतातील प्रशिक्षणार्थी परिसंस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण प्रोत्साहन योजनेत (NAPS) थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) धर्मेंद्र प्रधान यांनी केली सुरुवात


संबंधित सर्व घटकांमधे प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांना प्रोत्साहित करण्यासाठी "प्रशिक्षणार्थी सहभाग वाढवणे" या विषयावर चिंतन शिबिराचे आयोजन

Posted On: 12 AUG 2023 9:28AM by PIB Mumbai

 

देशव्यापी स्तरावर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये उद्योग आणि तरुण या दोघांच्याही सहभागाला चालना देण्यासाठी, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत (NAPS) थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) सुरुवात केली.  NAPS मध्ये आज थेट लाभ हस्तांतरणा अंतर्गत एक लाख प्रशिक्षणार्थी उमेदवारांना अंदाजे 15 कोटी रुपये प्रधान यांनी वितरित केले.

2023-08-11 19:49:48.8220002023-08-11 19:49:48.896000

राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेची 2016 मध्ये सुरूवात झाल्यापासून 31 जुलै 2023 पर्यंत एकूण 25 लाख तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुमारे 2.6 लाख प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आर्थिक वर्ष 23-24 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

सर्व क्षेत्रांमध्ये दर्जेदार प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केन्द्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे सक्रिय आस्थापनांची संख्या 2018-19 मधील 6,755 वरून 2023-24 मध्ये 40,655 पर्यंत वाढली आहे.

आजचा दिवस आपल्या देशातील प्रशिक्षणार्थी परिसंस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे असे या उपक्रमाचे कौतुक करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले. राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेत थेट लाभ हस्तांतरणाची सुरुवात करणे हे, प्रशिक्षणार्थी कौशल्याला महत्त्वाकांक्षी बनवण्याच्या तसेच शिकता शिकता कमवा  या NEP मध्ये अध्याहृत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयदृष्टीस साकारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.  आज DBT द्वारे अभ्यासवृत्ती मिळालेल्या सर्व 1 लाख प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.

***

M.Iyengar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948077) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu