संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीचा घेतला आढावा
समारंभामध्ये सहभागी होणाऱ्या एनसीसी छात्रांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नवी दिल्ली येथील लाल किल्ला प्रांगणामध्ये 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना आज मार्गदर्शन केले. देशातील सर्व जिल्ह्यातून या छात्रांची निवड करण्यात आली आहे.
छात्रांना मार्गदर्शन करताना अजय भट्ट म्हणाले की, देशासाठी बलिदान देणारे योद्धे आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान असतील. त्यांनी एनसीसी छात्रांचे भविष्यातील सैनिक असे वर्णन करून, या देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी हे छात्र मजबूत आधारस्तंभ असतील, असे ते म्हणाले.“तुम्ही अमृत काळातील पिढीचे प्रतिनिधित्व करणारे एनसीसी छात्र म्हणून आणि देशातील तरुण पिढी म्हणूनही महत्वाचे आहात. तुमची अमृत पिढी येत्या 25 वर्षात देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि भारताला स्वावलंबी आणि विकसित करेल,” असे ते म्हणाले.
संरक्षण राज्यमंत्री यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील तरुणांसाठी घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली. भारतातील तरुणांसाठी नवनवीन मार्ग खुले होत आहेत. भारतातील डिजिटल क्रांती असो, भारतातील स्टार्ट-अप क्रांती असो, नवोन्मेषाची क्रांती असो,या सर्व गोष्टींचा सर्वाधिक फायदा तरुणांना मिळणार आहे. संरक्षण क्षेत्रातील सुधारणांमुळे तरुण पिढीलाही नवीन संधी उपलब्ध होत आहेत,” असे ते म्हणाले.
राज्यमंत्री अजय भट्ट यांनी एनसीसी छात्रांच्या त्यांच्या उत्साहाचे आणि उच्च मनोबलाचे कौतुक केले.
यावेळी संरक्षण राज्यमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आणि एनसीसी छात्र, संबंधित अधिकारी आणि कर्तव्यावर तैनात असलेल्या जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1947864)
आगंतुक पटल : 144