जलशक्ती मंत्रालय

व्हायब्रंट व्हिलेज चे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण


लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात महाराष्ट्रातील हर घर जल योजनेचे श्रमिक विशेष अतिथी म्हणून होणार सहभागी

या वर्षी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास देशभरातील सुमारे 1,800 विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत

Posted On: 11 AUG 2023 4:14PM by PIB Mumbai

मुंबई/नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याची सांगता होत असताना, व्हायब्रंट व्हिलेजचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार, नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारणीत मदत करणारे श्रमयोगी, खादी क्षेत्रातील कामगार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाळा शिक्षक, सीमा रस्ते संघटनेचे कार्यकर्ते आणि देशाच्या विविध भागात सुरू केलेल्या अमृत सरोवर प्रकल्प आणि हर घर जल योजना प्रकल्पांसाठी काम करणारे आणि मदत करणाऱ्यांना त्यांच्या जोडीदारासह या वर्षी नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील हर घर जल योजनेचे तीन श्रमिक उपस्थित राहणार आहेत. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे 1,800 व्यक्तींमध्ये असे पन्नास कामगार त्यांच्या कुटुंबियांसह येणार आहेत. भारतभरातील सर्व स्तरातील लोकांना आमंत्रित करून उत्सवात सहभागी होण्याचा उपक्रम हा सरकारने ‘लोक सहभाग’ या संकल्पनेनुसार घेतला आहे. या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्‍यात आलेल्या 50 कामगारांपैकी तिघेजण महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील लाखापूरच्या चंद्रकला मेश्राम यांचा समावेश आहे, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नवी दिल्लीमध्‍ये  लाल किल्ला, येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी आमंत्रित केल्याबद्दल मला  आणि  माझ्या पतीला खूप आनंद झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

‘हर घर जल’ योजनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लाखापूरमध्ये 300 हून अधिक कुटुंबे राहत आहेत. ‘हर घर जल’  योजनेपूर्वी गावात पाणीटंचाई होती. हर घर जल योजनेने पाण्याची समस्या सोडविण्यास मदत केली असून गावासाठी  148 कायमस्वरूपी जलवाहिन्या  देण्‍यात आल्या आहेत. यामुळे गावातील जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे.

महाराष्ट्रातील आणखी एक विशेष पाहुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील ग्रामपंचायत भाटीवडे येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रकाश नामदेव मंगोणकर म्हणाले, दिल्लीतील लाल किल्ल्यावरील सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी माझी निवड झाली याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने. मला या कार्यक्रमाचा भाग बनवल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सरकारचा आभारी आहे.

गावातील विहिरीजवळ उभ्‍या असलेल्या चंद्रकला मेश्राम.  या विहिरीतून घरोघरी पाणी पोहोचवले जाते.

महाराष्ट्रातील आणखी एक विशेष अतिथी म्हणून  प्रकाश नामदेव मंगोणकर राजधानीला भेट देण्‍यासाठी जाणार आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील ग्रामपंचायत भाटीवडे येथील पाणीपुरवठा आणि  स्वच्छता समितीचे सदस्य प्रकाश नामदेव मंगोणकर म्हणाले, दिल्लीतील लाल किल्ल्यावरील सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी माझी निवड झाली याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणा-या  कार्यक्रमाचा भाग बनवल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सरकारचा आभारी आहे.

आपल्या गावात या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल माहिती देताना मंगोणकर म्हणाले, माझे गाव हर घर जल योजनेचे अभिमानास्पद लाभार्थी आहे. या  योजनेच्या माध्यमातून नदीपात्रात ‘ वेगळा सज्जा’ तयार करण्यात आलात्यामाध्‍यमातून  गावातील सर्व घरांना पाणी साठा आणि वर्षभर वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. आज आमच्या गावातील सर्व घरांमध्ये वैयक्तिक नळ आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर शुद्ध आणि स्वच्छ पाणी दिले जाते.

 

S.Patil/V.Joshi/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1947753) Visitor Counter : 116


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi