आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे सुरक्षेसाठी गेल्या 9 वर्षांत केलेल्या सर्व आवश्यक उपाययोजनांचे चांगले परिणाम मिळाले आहेत : अर्जुन मुंडा


रेल्वे अपघातांच्या संख्येत 2000-01 मधील 473 वरून 2022-23 मध्ये 48 पर्यंत झाली घट: अर्जुन मुंडा

Posted On: 09 AUG 2023 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

सरकारने रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत असे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. रेल्वे सुरक्षेसाठी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या उपाययोजनांची त्यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. रेल्वे आणि रेल्वेप्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यासाठी गेल्या 9 वर्षांत सर्व आवश्यक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. परिणामी रेल्वे अपघातांच्या संख्येत 2000-01 मधील 473 वरून 2022-23 मध्ये 48 पर्यंत घट झाली आहे असे रेल्वे अपघातांच्या संख्येबद्दल माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले.

रेल्वे अपघातांची 2004-14 या कालावधीतील सरासरी संख्या वर्षाला 171 होती, तर 2014-23 या कालावधीत ती वर्षाला 71 इतकी कमी झाली असे त्यांनी सांगितले. रेल्वेने, रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी 2017-18 मध्ये  राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष (RRSK) या नावाने पाच वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या एका महत्त्वाच्या निधीची सुरुवात केली. महत्वाच्या सुरक्षा मालमत्तांच्या बदली/नूतनीकरण/अद्ययावतीकरण यासाठी याचा उपयोग केला जातो.  या अंतर्गत  2017-18 पासून 2021-22 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोषाच्या एकूण कामांवर 1.08 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत.

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी 31.05.2023 पर्यंत 6427 स्थानकांवर पॉइंट्स आणि सिग्नल्सच्या केंद्रीकृत कार्यान्वयनासह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वे फाटकांची सुरक्षा वाढवण्यासाठी 31.05.2023 पर्यंत 11093 फाटकांवर इंटरलॉकिंग सुविधा उपलब्ध केली अर्जुन मुंडा म्हणाले की अशी माहितीही त्यांनी दिली.

रेल्वेमार्गांची सुरक्षा वाढवण्यासाठी विद्युत साधनांनी पडताळणी करण्याकरीता 31.05.2023 पर्यंत 6377 स्थानकांवर संपूर्ण ट्रॅक सर्किटिंग सुविधा उपलब्ध केली आहे असे अर्जुन मुंडा यांनी सांगितले.

लोको पायलटची सतर्कता सुनिश्चित करण्यासाठी लोकोमोटिव्ह दक्षता नियंत्रण उपकरणे (व्हीसीडी) सज्ज आहेत. लोको पायलट वेळेवर इशारा प्राप्त करु शकतात आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतात असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

धुके असताना  दृश्यमानता कमी असते अशा वेळी चालक दलाला सूचना देण्यासाठी सिग्नलच्या आधी दोन ओएचई खांबांवर रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह सिग्मा फलक प्रदान केले जातात. या सर्व उपायांचे चांगले परिणाम दिसून आल्याचे अर्जुन मुंडा यांनी सांगितले.

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947248) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu