सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गटारात उतरून मानवी सफाई करण्याच्या पध्दतीला आळा घालण्यासाठी रोबोट 'बँडीकूट' तंत्रज्ञान

Posted On: 09 AUG 2023 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

बॅंडीकूट सारखी उत्पादने केवळ गटारांच्या  मॅनहोलच्या तळाशी जमा होऊन अडकलेला कचरा आणि गाळ काढून टाकण्याचेच काम करत असून त्यांचा उपयोग मर्यादित आहे,त्यामुळे गटारांमध्ये गाळ साठण्याची आणि सांडपाणी बाहेर वाहण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य मॅनहोल डी-ग्रिटिंग यंत्रे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे,जी यंत्रे मॅनहोलमध्ये प्रवेश न करता वापरता येतील आणि वेळोवेळी योग्यप्रकारे साफसफाई करता येईल.अशाप्रकारे इमर्जन्सी डी-ग्रिटिंग मॅनहोल्सच्या साफसफाईची गरज अधिक सोप्या प्रकारच्या  मशीन्सचा अवलंब करून पूर्ण केली जाऊ शकते,जी सहजपणे स्थानिक स्तरावर तयार केली जाऊ शकतात, अधिक प्रमाणात नसेल तरी जवळजवळ तितकीच स्वच्छता करतील, समान पध्दतीने ज्यांचा वापर करता देईल, तसेच स्वच्छता कामगारांसाठी तितक्याच प्रतीची सुरक्षितता सुनिश्चित करतील.

शहरांना त्यांच्या मॅनहोल्स आणि गटारांच्या व्यवस्थापनासाठी साधी, किफायतशीर यांत्रिक उत्पादने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एमएस कायदा, 2013 च्या कलम 33 नुसार प्रत्येक स्थानिक प्राधिकरण आणि इतर एजन्सीने गटार आणि सेप्टिक टाक्यांच्या साफसफाईसाठी योग्य ती तांत्रिक उपकरणे वापरणे अपेक्षित आहे. सरकारनेही यासाठी आर्थिक सहाय्य, प्रोत्साहन आणि इतर माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.

मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणून रोजगारावर बंदी घालणे आणि त्यांचे पुनर्वसन नियम, 2013 (MS नियम, 2013) नुसार नियुक्ती करणाऱ्याने कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे, साधने प्रदान करणे आणि नियमांमध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी सुनिश्चित करणे अनिवार्य आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने गटार आणि सेप्टिक टाक्यांच्या साफसफाईसाठी मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे. या व्यतिरिक्त, खालील गोष्टींची खात्री करण्यासाठी देशातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये (ULB) नमस्ते (NAMASTE)योजना लागू केली जात आहे:-

  • भारतात स्वच्छतेच्या कामात मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे
  • सर्व स्वच्छतेची कामे कुशल कामगारांद्वारे केली जातील,हे पहाणे
  • कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या थेट संपर्कात येत नाही,यांची काळजी घेणे
  • नोंदणीकृत आणि कुशल स्वच्छता कामगारांकडून सेवा घेण्यासाठी स्वच्छता सेवा कामगारांमध्ये (व्यक्ती आणि संस्था) जागरूकता वाढविणे
  • यांत्रिक स्वच्छता सेवांचे सुरक्षित वितरण सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ स्वच्छता प्रतिसाद केंद्र (इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट्स ,ERSUs) मजबूत आणि सक्षम करणे.
  • स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता उपक्रम चालविण्यासाठी सक्षम करणे आणि मशीनद्वारे साफसफाईच्या कार्याच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

ही योजना सीवर सेप्टिक टँक कामगारांना आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (AB-PMJAY )अंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण, सुरक्षा उपकरणे आणि आरोग्य विम्याचे संरक्षण  देऊन यांत्रिक उपकरणांसह सुरक्षित स्वच्छता सुनिश्चित करते आणि त्यांच्या कामाला  औपचारिक रीतीने सन्मान देते.

ही माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1947242) Visitor Counter : 152