रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारत नवीन मोटार मूल्यांकन कार्यक्रम

Posted On: 09 AUG 2023 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मते /सूचनांसाठी भारत नवीन मोटार मूल्यांकन कार्यक्रम (बीएनसीएपी ) संदर्भात ,भारत सरकारद्वारे अधिसूचित केंद्रीय मोटर वाहन नियम  (केंद्रीय मोटर वाहन नियम), 1989 मधील मसुदा नियम 126ई  चा जीएसआर  464(ई ) 28 जून 2023 रोजी जारी केला आहे. यामध्ये खालील प्रस्तावित केले आहे: -

वाहन उद्योग मानके  (एआयएस )-197 नुसार, देशात उत्पादित किंवा आयात केलेल्या 3.5 टन पेक्षा कमी एकूण वाहन वजन असलेल्या एम 1 श्रेणीच्या [प्रवाशांच्या वाहतुकीसाठी  वापरण्यात येणारी मोटार वाहने, ज्यामध्ये चालकाच्या आसना  व्यतिरिक्त आठपेक्षा अधिक  आसने नसतात] प्रकारातील  मंजूर मोटर वाहनांना हे  लागू आहे.

एआयएस197 मध्ये वाहन निवड, चाचणी प्रोटोकॉल इत्यादींबाबत तपशीलवार प्रक्रिया समाविष्ट आहे. निवडलेल्या वाहनांची चाचणीही  केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 मध्ये संदर्भित चाचणीसंस्थांमध्ये  केली जाईल.

चाचणी संस्था  एआयएस-197 नुसार वाहनांचे मूल्यमापन करेल आणि फॉर्म 70-बी  नुसार नियुक्त केलेल्या संस्थेला मूल्यांकन अहवाल सादर करेल.मूल्यांकन अहवालाची तपासणी आणि मंजुरी मिळाल्यावर, नियुक्त संस्थेद्वारे  नियुक्त केलेल्या पोर्टलवर वाहनाचे स्टार रेटिंग अपलोड केले जाईल.

मात्र ,या नियमातील काही  नियम 126 नुसार किंवा केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्‍या उत्पादन आवश्‍यकतेच्‍या अनुरुप  टाईप अ‍ॅप्रूवलच्‍या आवश्‍यकतेतून केंद्र सरकारने सूट दिलेल्या वाहनांना लागू होणार नाही.

मसुदा अधिसूचनेनुसार हे  1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1947092) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil