राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुडुचेरीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ नागरी स्वागत समारंभ; विल्लीयानुर येथे राष्ट्रपतींच्या हस्ते 50 खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटन

Posted On: 07 AUG 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ पुद्दुचेरी सरकारद्वारे आयोजित केलेल्या  नागरी सत्काराला राष्ट्रपती  आज उपस्थित होत्या. राष्टपतींनी आज (7 ऑगस्ट 2023) JIPMER, अर्थात जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था मध्ये लिनियर एक्सीलरेटरचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींनी विल्लीयानुर इथल्या 50 खाटांच्या रुग्णालयाचे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.

पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाने राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्या पुढे म्हणाल्या की पुद्दुचेरी हे  देशातला सर्वाधिक साक्षरता दर असलेल्या भागांपैकी एक  आहे आणि लिंग गुणोत्तर महिलांसाठी अनुकूल आहे. याचाच अर्थ, पुद्दुचेरीतील लोकांचा स्त्री -पुरुष समानतेवर विश्वास असल्याचे दिसून येते, असे गौरवैद्गारही मुर्मू यांनी काढले. राष्टपतींनी पुद्दुचेरीच्या रहिवाशांचे विकास आणि प्रगतीसाठी तसंच आधुनिक आणि संवेदनशील दृष्टिकोनाबद्दलही कौतुक केले.

पुद्दुचेरी हे आध्यात्मिक पर्यटनासाठी एक अद्भुत ठिकाण आहे ज्याकडे जगाचा ओढा झपाट्याने  वाढत आहे  त्याचबरोबर या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मजबूत चालना देण्याची क्षमता यामध्ये आहे, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. पर्यटनाच्या वाढीसह आरोग्य पर्यटन आणि इको-टूरिझमशी संबंधित उपक्रमांनाही चालना मिळेल, असा आशावाद मुर्मू यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी कृपया इथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Mohite/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946433) Visitor Counter : 140