अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडूमधील अदिचनल्लूर पुरातत्व स्थळी 'आयकॉनिक साइट्स म्युझियम' ची केली पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2023 2:45PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी तामिळनाडू येथे तामिराबरानी (पोरुनई) नदीच्या काठावर वसलेल्या थुथुकुडी जिल्ह्यातील अदिचनल्लूर या प्राचीन आणि ऐतिहासिक पाषाणयुगातील दफनभूमीला भेट दिली. हे पुरातत्व स्थळ केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये प्रतीकात्मक स्थळ 'आयकॉनिक साइट्स' म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या पाच स्थळांपैकी एक आहे.
RPPX.jpeg)
याप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आदिचनल्लूर इथे 'प्रतीकात्मक संग्रहालयाची पायाभरणीही केली. या कार्यक्रमात सीतारामन यांनी आदिचनल्लूर स्थळाच्या वैशिष्टयपूर्ण आणि समृद्ध इतिहासाचा उल्लेख केला. इसवी सन पूर्व 467 मधील विविध वस्तू तसेच इसवी सन पूर्व 665 मधील भरड धान्य आणि तांदळासारखी अन्नधान्ये येथे खोदकामादरम्यान सापडली आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आगामी संग्रहालयात या सर्व कलाकृती 'मूळ स्वरूपात ' प्रदर्शित केल्या जातील , ज्यामुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना तसेच संशोधकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.
18WT.jpeg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने या संग्रहालयाच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आणि 2021 च्या अर्थसंकल्पात घोषित या उपक्रमाची पूर्तता केली याची अर्थमंत्र्यांनी जनतेला आठवण करून दिली . या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने तिरुचेंदूरला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा महत्वाचा थांबा असेल अशी सरकारने या स्थळाची कल्पना मांडली होती.
OC73.jpeg)
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विद्यमान आणि भावी पिढ्यांसाठी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान, जतन आणि तो प्रदर्शित करण्याच्या केंद्र सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा उल्लेल्ख केला.
9CX6.jpeg)
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले की, ज्ञान संवर्धनाच्या क्षेत्रात, 3.4 कोटी पृष्ठे संख्या असलेली 3.3 लाख हस्तलिखिते डिजीटल स्वरूपात आणली आहेत. याशिवाय, दिल्लीत नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधील विस्तीर्ण जागेवर 950 खोल्या असलेले सुसज्ज नवीन राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
9V9O.jpeg)
या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये आठ संकल्पना आधारित विभाग असतील, ज्यामध्ये 5,000 वर्षांहून अधिक कालखंडातील भारताची संस्कृती प्रदर्शित केली जाईल.
ZSI8.jpeg)
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1946058)
आगंतुक पटल : 182