ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
‘भारतीय मानक ब्यूरोने मानकीकरण आणि अनुरूपता मूल्यांकनामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी 35 संस्थांबरोबर केला सामंजस्य करार
Posted On:
05 AUG 2023 4:54PM by PIB Mumbai
बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरो, या देशाच्या राष्ट्रीय मानक संस्थेने मानकीकरण आणि अनुरूपता मूल्यांकनामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी देशभरातील 35 प्रतिष्ठित संस्थांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या संस्थांमध्ये देशभरातील प्रमुख एनआयटी, विविध राज्यांतील काही सरकारी आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे.
या सामंजस्य करारामुळे भागीदार संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्युरोच्या तांत्रिक समित्यांशी संलग्न करून, संबंधित संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा मिळू शकणार आहे. मानकीकरण आणि अनुरूपता मूल्यमापनावर संयुक्तपणे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रकाशनांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. तसेच या करारामुळे दर्जाशी संबंधित कामांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाचे मानकीकरण, चाचणी आणि अनुरूपता मूल्यमापन आणि सामायीकरण प्रयोगशाळा सुविधांसाठी उत्कृष्टता केंद्राच्या वापराविषयी विचार करण्यात येणार आहे.
या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसोबत केलेल्या सामंजस्य करारांमुळे, मानके तयार करण्याच्या प्रक्रियांना चालना मिळेल तसेच हे काम अधिक समृद्ध होईल, यावर बीआयएस चे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी भर दिला. या कार्यक्रमाच्या आराखड्याबद्दल आणि भविष्यातील वाटचालीबद्दल तपशीलवार माहिती दिली. बीआयएसचे उपमहासंचालक चंदन बहल यांनी या भागीदारीमध्ये कशा पद्धतीने कार्य केले जाणार आहे, हे सांगितले.
बीएसआय ही एक वैधानिक संस्था आहे. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. उत्पादन प्रमाणन (आयएयआय मार्क), व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे हॉल मार्किंग/आर्टिफॅक्ट्स आणि प्रयोगशाळा सेवा यांसारख्या विविध योजना उद्योगाच्या फायद्यासाठी संस्था काम करते तसेच ग्राहक हिताचे संरक्षण करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
***
R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946056)
Visitor Counter : 145