कोळसा मंत्रालय
व्यावसायिक लिलावाच्या सातव्या फेरीच्या दुसऱ्या दिवशी तीन कोळसा खाणींचा लिलाव एकूण भूगर्भीय साठा 1,499.40 दशलक्ष टन
Posted On:
02 AUG 2023 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023
कोळसा मंत्रालयाने व्यावसायिक खाणकामासाठी 29 मार्च 2023 रोजी 7 व्या फेरी अंतर्गत आणि 6 व्या फेरीच्या दुसऱ्या प्रयत्नांतर्गत कोळसा खाणींचा लिलाव सुरू केला होता. बोलींचे मूल्यांकन केल्यानंतर, 01.08.2023 पासून सहा खाणींसाठी फॉरवर्ड ई-लिलाव सुरू करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी, तीन कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध करण्यात आल्या, त्यापैकी एक सीएमएसपी कोळसा खाण आणि दोन एमएमडीआर कोळसा खाणी होत्या. कोळसा खाणींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: -
- एक खाणीचे संपूर्ण उत्खनन झाले आहे तर इतर दोन अंशतः उत्खनन केलेल्या खाणी आहेत.
- तीन कोळसा खाणींमध्ये एकूण भूगर्भीय साठा 1,499.40 दशलक्ष टन (MT) इतका आहे.
- या कोळसा खाणींसाठी एकत्रित सर्वोत्तम उत्पादन क्षमता पीआरसी 4.00 MTPA आहे.
दुसऱ्या दिवसाचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.
S. No.
|
Name of the Mine
|
State
|
PRC (mtpa)
|
Geological Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Reserve Price (%)
|
Final Offer (%)
|
1
|
Meenakshi West
|
Odisha
|
NA
|
950.00
|
Hindalco Industries Limited
|
4.00
|
33.75
|
2
|
North Dhadu (Eastern Part)
|
Jharkhand
|
4.00
|
439.00
|
NTPC Mining Limited
|
4.00
|
6.00
|
3
|
Pathora East
|
Madhya Pradesh
|
NA
|
110.40
|
Shri Bajrang Power and Ispat Limited
|
4.00
|
43.75
|
कार्यान्वित केल्यावर, या कोळसा खाणींच्या सर्वोच्च उत्पादन क्षमतेनुसार (अंशतः उपलब्ध कोळसा खाणी वगळून) कोळसा खाणींमधून ~ 450 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळेल. या खाणींमुळे ~600 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित होईल आणि ~5,408 लोकांना रोजगार मिळेल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945243)
Visitor Counter : 136