अंतराळ विभाग

आपल्या मायभूमीवरून प्रक्षेपण करण्याची क्षमता आणि पृथ्वी निरीक्षण, उपग्रह दळणवळण, हवामानशास्त्र, अवकाश विज्ञान आणि नेव्हिगेशन आणि पायाभूत सुविधा कार्यक्रम राबवण्याच्या क्षमतेसह अंतराळ संशोधन आणि विकासामध्ये सर्वतोपरी सक्षम असलेल्या अंतराळ संशोधक राष्ट्रांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


सध्या, अवकाश क्षेत्रातील सुधारणांनंतर न्यूस्पेस उद्योग देखील वेगाने उदयास येत आहेत: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 02 AUG 2023 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, आपल्या मायभूमीवरून प्रक्षेपण करण्याची क्षमता आणि पृथ्वी निरीक्षण, उपग्रह दळणवळण, हवामानशास्त्र, अवकाश विज्ञान आणि नेव्हिगेशन आणि पायाभूत सुविधा कार्यक्रम राबवण्याच्या क्षमतेसह अंतराळ संशोधन आणि विकासामध्ये सर्वतोपरी सक्षम असलेल्या अंतराळ संशोधक राष्ट्रांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, अवकाश क्षेत्रातील सुधारणांनंतर सध्या न्यूस्पेस उद्योगही वेगाने उदयास येत आहेत.

मंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात इस्रोने केलेली महत्त्वपूर्ण प्रगतीही उद्धृत केली.

जुलै 2018 मध्ये क्रू एस्केप सिस्टीम (सीईएस) पात्र होण्यासाठी यशस्वी पॅड ॲबॉर्ट टेस्ट (पीएटी) आणि एप्रिल 2023 मध्ये पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मोहिमे व्यतिरिक्त (जुलै 2018 - जुलै 2023) या कालावधीत 27 उपग्रह आणि 22 प्रक्षेपण यान मोहिमा यशस्वीरित्या राबवण्यात आल्या आहेत.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1945175) Visitor Counter : 94


Read this release in: English , Urdu , Tamil