कृषी मंत्रालय

लसूण पिकाचे उत्पादन

Posted On: 01 AUG 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

वर्ष 2021-22 आणि 2022-23 मध्ये देशात उत्पादित (पहिला आगाऊ अंदाज) लसूण पिकाचा तपशील खाली दिला आहे:

वर्ष 

उत्पादन  ( ‘000टनांमध्ये)

2021-22

3523

2022-23 (पहिला आगाऊ अंदाज)   

3369

भारतातील विविध ऋतू आणि कृषी-हवामान विषयक यांना अनुकूल ठरणाऱ्या लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. तसेच,पुणे येथील आयसीएआर- अखिल भारतीय कांदा आणि लसूण संशोधन प्रकल्प नेटवर्कच्या (आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी)माध्यमातून देशात विविध ठिकाणी स्थान-विशिष्ट स्वीकारविषयक चाचण्या करण्यात येत आहेत.

आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी च्या माध्यमातून देशात सहा ठिकाणी (महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी)) खरीप हंगामात लागवड करण्यासाठी सुयोग्य जाती निश्चित करण्यासाठी तीन वर्षे क्षेत्र चाचण्या करण्यात आल्या. भीमा पर्पल आणि जी-282 या दोन जातींनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी) या तीन ठिकाणी 30 ते 40 क्विंटल प्रती हेक्टर इतके उत्पादन देत उत्तम कामगिरी केली. मात्र, रबी हंगामातील उत्पादनाच्या तुलनेत खरीप हंगामातील उत्पादन खूप कमी होते. कर्नाटकातील लसूण उत्पादक सध्या गदग लोकल या तेथील स्थानिक जातीची लागवड करत आहेत आणि ही जात तेथे चांगले उत्पादन देत आहे.

त्याशिवाय, जी-389 नामक लसणाची आधुनिक जात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात लागवडीसाठी अधिक योग्य ठरते आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1944849) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Telugu