शिक्षण मंत्रालय

अखिल भारतीय शिक्षा समागम 2023 परिषदेचा समारोप; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले समारोपाचे भाषण


भारताला ज्ञानाधारीत महासत्ता बनवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्याकरता, शिक्षण परिवार वचनबद्ध - धर्मेंद्र प्रधान

सुमारे 3000 शिक्षणतज्ञ आणि इतर तज्ञ, संकल्पनेवर आधारीत 16 सत्रांमध्ये राहिले उपस्थित; राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने योग्य अशा उपाययोजना आणि कल्पनांची केली देवाणघेवाण

Posted On: 30 JUL 2023 7:08PM by PIB Mumbai

 

भारताला समन्यायी आणि ज्ञानवान  समाज बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या शिक्षणतज्ञांनी केलेल्या संकल्पासह, अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) 2023 या परिषदेचा आज समारोप झाला.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून समारोपाचे भाषण केले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉक्टर सुभाष सरकार आणि डॉक्टर राजकुमार रंजन सिंग हे सुद्धा समारोप्रसंगी उपस्थित होते.

भारताला ज्ञानाधारीत महासत्ता बनवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्याकरता, शिक्षण परिवार वचनबद्ध आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समारोपसत्राला संबोधित करताना सांगितले. भविष्याचा दृष्टीने सज्ज राहण्यासाठी प्रत्येकाने भारतीय भाषांमध्ये पारंगत होण्याचा विचार केला पाहिजे असे प्रधान म्हणाले. एन सी एफ अर्थात नॅशनल क्युरीकुलम फ्रेमवर्क, म्हणजेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची  मार्गदर्शक तत्वे  पाठ्यपुस्तकांमधून उमटवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, सर्व शैक्षणिक संस्था आणि कौशल्य प्रदात्या संस्थांनी यासाठी मन लावून, रस घेऊन काम करायला हवे असेही त्यांनी सांगितले. युवा वर्गामध्ये क्षमता निर्मिती करणे आणि महाविद्यालयीन कारभार परिणामकारकपणे राबवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत राहतील हे पहायला हवे, यावरही त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमातून, भारताचा सन्मान, भारताची काही करुन दाखवण्याची वेळ आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज कर्मचारीबळ या बाबींचा पाठपुरावा झाला, असे डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी यावेळी बोलताना ठामपणे विषद केले.

शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यात आणि आकांक्षा पूर्ण करण्यात असलेल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या महत्त्वावर, डॉ. सुभाष सरकार यांनी प्रकाश टाकला.

नवीन शक्यता आणि संधींची भूमी म्हणून जग भारताकडे पाहत आहे, असे अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले.

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण या संकल्पनांवर आधारित 16 सत्रे, या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये झाली आणि त्यामध्ये शिक्षणतज्ञांनी भाग घेतला. शिक्षणतज्ञां व्यतिरिक्तसंशोधक, धोरणकर्ते, नियामक, उद्योग तज्ञ आणि उद्योजककेंद्र -राज्य -केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी अधिकारी यांचाही सहभागींमध्ये समावेश होता.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी विचारमंथन करणे आणि विविध पद्धती-दृष्टिकोन मांडणे, पुढील कृती आराखडा आणि अंमलबजावणीसाठीची धोरणे प्रभावीपणे सुस्पष्ट करणे, ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे, आव्हानांवर चर्चा करणेराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या परिणामकारक, सुरळीत आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी  सर्व भागधारकांना एकत्र येण्याकरता, त्यांचे जाळे तयार करण्याकरता एक सामायिक व्यासपीठ प्रदान करणे,   आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या  सर्वोत्तम पद्धतींवर काळजीपूर्वक विचार करून त्यांचे आदान प्रदान करणे, हे या परिषदेचे उद्देश होते.

परिषदेच्या या दोन दिवसांदरम्यान, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि कौशल्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या एकूण 106 महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944208) Visitor Counter : 163


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Tamil