इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आपल्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने भारताची वेगाने प्रगती: सेमीकॉन इंडिया 2023 च्या दुसऱ्या दिवशी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
जागतिक सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रामध्ये भारताच्या बळकट, सचेत आणि स्पर्धात्मक उपस्थितीसाठी सेमीकंडक्टर उद्योजकांचा धोरणासंदर्भात विचारविनिमय
Posted On:
30 JUL 2023 9:09AM by PIB Mumbai
गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया 2023 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संबोधित केले. सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्स 2023 ही परिषद सेमीकंडक्टर उद्योगासाठी भारताची वाढती वचनबद्धता दर्शवत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आपल्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे, असेही ते म्हणाले.
तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया 2023 परिषदेच्या दुसर्या दिवशी उद्योग, शिक्षण आणि सरकारमधील प्रतिनिधींचा मोठा सहभाग होता. पुढील पिढीच्या कॉम्प्युटिंगच्या सत्रात, व्हेंटाना मायक्रो सिस्टीम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी बक्था यांनी डिजिटल स्वायत्तता आणि आरआयएससी -व्ही द्वारे समर्थित सार्वभौम डेटा केंद्राच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भातील महत्वाच्या पैलूंवर चर्चा केली. तर मिहिरा एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा कोदुरी यांनी कॉम्प्युटिंग क्षेत्रातील भविष्यावर प्रकाश टाकला आणि स्टार्टअप्ससाठी वेळ आणि आर्थिक संसाधनांच्या मूल्यावर भर दिला.
सेमीकंडक्टर पॅकेजिंगसह विविध समर्पक विषयांवर चर्चा करण्यासाठी चचासत्र आयोजित करण्यात आले होते. "नेक्स्ट-जनरेशन डिझाईन्स" वरील चर्चांनी सेमीकंडक्टर उद्योगातील अत्याधुनिक प्रगती आणि भविष्यातील शक्यतांचा शोध घेतला.
सेमीकंडक्टर उद्योगात भारताचे स्थान बळकट करण्यासाठी चिप डिझाइन स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासंदर्भात विनोद धाम यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतातील भविष्यातील डिझाइन आणि गुंतवणुकीच्या संधींवरील चर्चासत्रात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यावरही प्रकाश टाकण्यात आला.
सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासंबंधित प्रख्यात वक्ते- अप्लाइड मटेरियलचे डॉ. रमन अच्युतारामन; लॅम रिसर्चचे शेषा वरदराजन; अप्लाइड मटेरियलचे अहमद खान, केएलए आणि प्रबू राजा यांनी या चर्चासत्रांमध्ये, या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत आपला ठसा कशाप्रकारे उमटवू शकतो यावर आपले विचार मांडले तसेच लवचिक सेमीकंडक्टर पुरवठा-साखळीसाठी सेमीकंडक्टर उपकरणांच्या नवोन्मेष आणि संशोधनात भारताची वाढती भूमिका यावर विचारविनिमय केला.
***
Sonal T/Sonal C/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944127)
Visitor Counter : 165