इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय सेमीकंडक्टर मिशनला (आयएसएम) पाठबळ देण्याचा ‘सेमी’ चा उद्देश
Posted On:
29 JUL 2023 7:15PM by PIB Mumbai
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (आयआयएससी) मधील सेंटर फॉर नॅनो सायन्स (CeNSE) आणि लॅम रिसर्च इंडिया यांच्यात गांधीनगर येथे सुरू असलेल्या सेमीकॉन इंडियामध्ये सामंजस्य करार झाल्याची घोषणा केली.
भारतीय सेमीकंडक्टर मिशनला(आयएसएम) भारतात झपाट्याने सेमीकंडक्टर उत्पादन आणि परिसंस्थेची रचना करण्यासाठी पाठबळ देण्याची ‘सेमी’ने तयारी दर्शवली. आयएसएमच्या सेमीकॉन इंडियाच्या दोन यशस्वी आयोजनाच्या आधारावर हे सहकार्य होणार आहे आणि ‘सेमी’ एन्ड टू एन्ड सेमीकंडक्टर परिसंस्थेत हितधारकांना एकत्र आणण्याचे काम सुरू ठेवेल. या संदर्भात एक सामंजस्य करार प्रगतीपथावर आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, सचिव अल्केश कुमार शर्मा, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा आणि सरकार आणि उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944064)
Visitor Counter : 141