गृह मंत्रालय

केंद्रीय गृह  आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रामेश्वरम येथे ‘डॉ. एपीजे अब्दुल कलामः मेमरीज नेव्हर डाय’ या पुस्तकाचे प्रकाशन


डॉ. अब्दुल कलाम यांची स्वप्ने साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात युवा वर्गासाठी आणि नव्या स्टार्टअप्ससाठी दरवाजे उघडले आहेत, तो दिवस आता दूर नाही जेव्हा भारत अंतराळ क्षेत्रात अग्रेसर असेल

Posted On: 29 JUL 2023 5:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज रामेश्वरम येथे डॉ. एपीजे अब्दुल कलामः मेमरीज नेव्हर डायया पुस्तकाचे प्रकाशन केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम हाऊस, मिशन ऑफ लाईफ गॅलरी म्युझियम आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यांनी विवेकानंद स्मारकाला देखील भेट दिली. अमित शाह यांनी जगप्रसिद्ध रामेश्वरम मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की रामेश्वरम मंदिर प्राचीन आणि वैभवशाली सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. प्रभू श्रीरामानी  श्री रामेश्वरम मंदिरात भगवान शंकरांची  पूजा केली, जे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मी भोलेनाथाकडे देशवासीयांच्या आणि देशाच्या समृद्धीकरता प्रार्थना केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवर डॉ. एपीजे अब्दुल कलामः मेमरीज नेव्हर डायया पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001PG1I.jpg

डॉ. एपीजे अब्दुल कलामः मेमरीज नेव्हर डायया पुस्तकाच्या प्रकाशनामुळे देशभरातील वाचकांना डॉ. कलाम यांच्याविषयी माहिती मिळवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि त्यांचे अनुसरण करण्याची संधी मिळेल. या पुस्तकामध्ये  भारतीय अग्निबाणशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा इतिहास, भारतीय राजकारणाचे आणि प्रशासन प्रणालीचे उत्कृष्ट विवेचन आणि डॉ. कलाम यांच्याशी संबंधित अनेक घटनांचे वर्णन   आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028QW9.jpg

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पाच क्षेपणास्त्रांसदर्भात खूप मोठे काम झाले. पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग आणि त्रिशूल ही त्या पाच क्षेपणास्त्रांची नावे असून ती नावे डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग आणि अध्यात्म यांच्याशी जोडलेले असल्याचे दर्शवतात. एक शास्त्रज्ञ जगाच्या कल्याणासाठी तेव्हाच काम करू शकतो जेव्हा त्याचा आत्मा विज्ञानाबरोबरच अध्यात्मासोबतही जोडलेला असेल, असे ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003MGYO.jpg

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया घातला  आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 55 अंतराळयान मोहिमा, 50 प्रक्षेपक वाहन मोहिमा, 11 विद्यार्थी उपग्रह, वातावरण पुनर्प्रवेशाची एक मोहीम आणि एकाच वेळी 104 उपग्रहांचे प्रक्षेपण अशा ऐतिहासिक कामगिरी केल्या आहेत, असे शाह यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00469HC.jpg

डॉ. अब्दुल कलाम यांची स्वप्ने साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात युवा वर्गासाठी आणि नव्या स्टार्टअप्ससाठी दरवाजे उघडले आहेत, तो दिवस आता दूर नाही जेव्हा भारत अंतराळ क्षेत्रात नेतृत्व करेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अंतराळ विज्ञानासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि अंतराळ क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00544NX.jpg

भारताच्या इतिहासात डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एक द्रष्टे, शास्त्रज्ञ आणि साधी राहणी असलेले व्यक्ती आणि महान देशभक्त म्हणून प्रत्येकाच्या स्मरणात राहतील, असे अमित शाह यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0067Z09.jpg

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944060) Visitor Counter : 237