कंपनी व्यवहार मंत्रालय
आयआयसीए प्रमाणित ईएसजी प्रोफेशनल: इम्पॅक्ट लीडर प्रोग्राम’, अंतर्गत, आयआयसीए संस्थेच्या वतीने शीर्ष ईएसजी इम्पॅक्ट लीडर्सच्या कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
29 JUL 2023 9:49AM by PIB Mumbai
स्कूल ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) या संस्थांनी काल आयएमटी (IMT) मानेसर येथील कॅम्पसमध्ये देशाच्या विविध भागातून प्रतिनिधीत्व केलेल्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रमुखांसह घेतलेल्या 2 दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ (PESB) चे सदस्य असलेल्या अमरजीत सिन्हा यांनी जागतिक पातळीवर कॉर्पोरेट क्षेत्रात होत असलेले बदल आणि त्यामध्ये इएसजी ESG भूमिका तसेच या क्षेत्रातला प्रभावी नेता बनण्यासाठी आवश्यक नेतृत्व कौशल्ये यावर प्रकाश टाकला. इ एस जी ESG च्या अधिकार क्षेत्रात प्रभावी नेत्यांची असलेली गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच इएसजी (ESG) परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिनिधींना प्रोत्साहन दिले. या पहिल्या तुकडीच्या कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयआयसीएची प्रशंसा केली.
आपल्या समारोपाच्या भाषणात,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA)चे महासंचालक आणि कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार, यांनी‘आयआयसीए प्रमाणित ईएसजी प्रोफेशनल: इम्पॅक्ट लीडर प्रोग्राम’, ला उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ इम्पॅक्ट लीडर्स’ (NAIL) संस्थेचे महत्त्व विशद केले. ईएसजी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आयआयसीए (IICA) द्वारे प्रमाणित सदस्यत्व-आधारित ही एकमेव संघटना आहे, असेही त्यांनी सांगितले.
जमशेदपूर येथील एक्सएलआरआय (XLRI) संस्थेचे प्राध्यापक रघु टाटा, यांनी धोरणांमधल्या मर्यादा आणि जागतिक कॉर्पोरेट समुदायाला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकून तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी कॉर्पोरेट महत्त्वाकांक्षा कशी वाढवण्याची गरज आहे, याविषयी पटवून देताना त्यांनी या सत्राची सुरुवात उत्साहात केली.
ईएसजी आणि नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, या संस्थेचे प्रमुख अशोक इमानी, यांनी या कार्यशाळेत ईएसजी क्षेत्रातल्या गुंतवणूकी संबंधातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि ईएसजी गुंतवणूकदाराची भूमिका याविषयी उपस्थित प्रतिनिधींना मंत्र दिला.
आयआयसीए संस्थेत सहाय्यक प्राध्यापक असलेल्या शंकर वेंकटेश्वरन, यांनी व्यवसाय धोरणातील सातत्यावर भर दिला आणि भौतिक जोखीमा ओळखून, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स (KPIs) विकसित करण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले.
श्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीचे सस्टेनेबल प्रेक्यूमेंट डिरेक्टर (ग्लोबल) कनिष्क नेगी, यांनी इएसजी (ESG) मधल्या “S” अर्थात सोशल या संज्ञेवर लक्ष केंद्रित करून त्याचे महत्त्व पटवून दिले. या व्यवसायातल्या कार्यप्रणालीत आणि विविध प्रक्रियांमध्ये मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी प्रभाव-केंद्रित नेतृत्वाचे महत्त्व यावेळी त्यांनी अधोरेखित केले.
इएसजी च्या भागीदार आणि युनिकस कन्सल्टेक आयएनसी(Uniqus Consultech Inc) च्या ग्लोबल हेड अनु चौधरी, यांनी हवामान जोखीम आणि यासंबंधीच्या मुख्य पैलूंबद्दल माहिती दिली ज्यामुळे उपस्थित सहभागींमध्ये हवामान जोखीम कमी करण्यासाठी हरित गृह वायु (GHG) शोधाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केली
एमडीआय संस्थेच्या प्राध्यापक रुपमंजरी सिन्हा रे, यांनी देखील सहभागींना, शाश्वत विकास उद्दिष्टांविषयी (SDGs) मार्गदर्शन केले.
आयआयसीए संस्थेच्या बिझनेस एन्व्हायर्नमेंट शाळेच्या प्रमुख रिमा दधिच, यांनी आजच्या झपाट्याने बदलत असलेल्या अर्थव्यवस्थेत इएसजी (ESG) क्षेत्रातल्या तज्ञांचे महत्त्व आणि त्यांच्या उपयोगतेवर प्रकाश टाकला, तसेच त्यांनी या कार्यशाळेसाठी स्वीकारलेल्या अनोख्या अध्यापनशास्त्राचे वेगळेपण स्पष्ट केले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चाळीस वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकारी आणि ईएसजी इम्पॅक्ट लीडर्स म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी इच्छुक असलेले आयआयसीए (IICA) संस्थेचे प्रशिक्षित व्यावसायिक उपस्थित होते.
आयआयसीए (IICA) संबंधित माहिती:
आयआयसीए (IICA) ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. कॉर्पोरेट घडामोडींच्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी देशातील अग्रणी संस्था म्हणून ही संस्था कार्यरत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात वाढ व्हावी, सुधारणा आणि नियमांना चालना मिळावी याकरिता या संस्थेच्या माध्यमातून सरकार, कॉर्पोरेट्स आणि इतर भागधारकांना विविध धोरणांच्या माध्यमातून मदत, संशोधन आणि क्षमता वाढ यासाठी समर्थन प्रदान केले जाते.
***
MI/VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1943925)
Visitor Counter : 115