रसायन आणि खते मंत्रालय

भारत जगाचे औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ: डॉ. मनसुख मांडवीय


'भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केन्द्र' यावरील तिसऱ्या जागतिक शिखर परिषदेची सांगता

Posted On: 28 JUL 2023 5:42PM by PIB Mumbai

 

भारत जगाचे औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे. असे केन्द्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. 'भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केन्द्र' (GCPMH 2023) यावरील तिसऱ्या जागतिक शिखर परिषदेचे समारोपाचे भाषण करताना ते आज बोलत होते. "शाश्वतता आणि वर्तुळाकार परिपूर्णता" ही परिषदेची संकल्पना होती. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने (फिक्की) याचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील घटकांनी यात उत्साहाने भाग घेतला.

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेसाठी उद्योगांची भरभराट आवश्यक असते यावर त्यांनी भर दिला. यासंदर्भात उद्योगांना पाठबळ देण्याची सरकारची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. सरकार म्हणून आम्ही वरवरचा विचार करण्याऐवजी सर्वंकष विचार करतो. व्यापक उद्योगांसाठी कमाल प्रशासन किमान सरकार अशी सर्वंकष परिसंस्था आम्हाला उभारायची आहे असे ते म्हणाले. या क्षेत्रातील प्रगती आणि सकारात्मक बदलांसाठी नवोन्मेषी तसेच शाश्वत उपाय सुचवण्याचे आवाहनही डॉ मांडवीय यांनी यावेळी केले.

केन्द्रीय रसायने आणि खते मंत्रालयाचे रसायने आणि पेट्रोकेमिकल विभागाचे सचिव अरुण भारको यांनी या दोन दिवसीय परिषदेचा धांडोळा घेतला. या शिखर परिषदेने, केन्द्र आणि राज्य सरकारे तसेच उद्योगांना संवाद साधण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ उपलब्ध केले असे ते म्हणाले.

परिषदेच्या संकल्पनेशी सुसंगत असणाऱ्या, निधी तसेच पर्यावरण विषयक मंजुरी, या रसायने आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील महत्त्वाच्या पैलूंवर त्यांनी लक्ष वेधले. उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण  भूमिका बजावलेल्या अनेक प्रमुख उद्योजकांनी परिषदेत भाग घेतला.

***

S.Kakade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943816) Visitor Counter : 93


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi