नागरी उड्डाण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोटमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
1405 कोटी रुपये खर्च करून 2534 एकर जमिनीवर नवीन टर्मिनल इमारत आणि हवाई पायाभूत सुविधांचा विकास
Posted On:
27 JUL 2023 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र रजनीकांत पटेल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राजकोट येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
नवीन टर्मिनल इमारत आणि हवाई पायाभूत सुविधा एकूण 2534 एकर क्षेत्रफळात 1405 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या आहेत.

आपल्या भाषणात ज्योतिरादित्य एम सिंधिया म्हणाले की या विमानतळाची संकल्पना आपल्या पंतप्रधानांनी सुमारे सात वर्षांपूर्वी मांडली होती. ही ऐतिहासिक भेट राजकोटच्या जनतेला समर्पित करण्यासाठी आज ते येथे उपस्थित आहेत.
सन 2014 मध्ये राजकोटहून दर आठवड्याला फक्त 56 विमानांचे उड्डाण होत होते, जे आता दुपटीहून अधिक झाले असून दर आठवड्याला 130 विमानांचे उड्डाण होते असेही सिंधिया म्हणाले.

* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943469)