पंतप्रधान कार्यालय

पृथ्वीवर आपण ज्या इतर प्राणीमात्रांसोबत राहत आहोत त्यांच्यासोबतचा सलोखा अमृत सरोवरे वृद्धिंगत करत आहेत : पंतप्रधान

Posted On: 27 JUL 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2023

 

अमृत सरोवरांचे महत्त्व  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.  जलसंवर्धन आणि लोकसहभागाबरोबरच, आपण पृथ्वीवर  ज्या  इतर प्राणीमात्रांसोबत राहत आहोत त्यांच्यासोबतचा सलोखा अमृत सरोवरे वृद्धिंगत करत आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

आसाममधील कामरूप जिल्ह्यात सिंग्रा येथील एका शांत सरोवरात उन्हाळ्यात स्नान करणाऱ्या  काही हत्तींबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत  बिस्वा सरमा   यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधान म्हणाले;

“आल्हाददायक दृश्य. जल संवर्धन आणि लोकसहभागाबरोबरच, ज्यांच्यासोबत आपण  पृथ्वीवर  ज्या  इतर प्राणीमात्रांसोबत राहत आहोत  त्यांच्यासोबतचा  सलोखा अमृत सरोवरे वृद्धिंगत करत आहेत .”

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943454) Visitor Counter : 88