पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
लोकसभेत वन (संवर्धन) दुरुस्ती विधेयक 2023 मंजूर
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2023
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज वन (संवर्धन) दुरुस्ती विधेयक 2023 संसदेच्या संयुक्त समितीने आज लोकसभेत विचारात घेण्यासाठी अहवालाद्वारे मांडले आणि त्यानंतर ते विधेयक मंजूर करण्याची विनंती सभागृहाला केली. चर्चा केल्यानंतर आणि सदस्यांचे मत विचारात घेतल्यानंतर, लोकसभेने हे विधेयक मंजूर केले.
वन (संवर्धन) कायदा, 1980 हा देशातील जंगलांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा केंद्रीय कायदा आहे. या कायद्यांतर्गत आरक्षित जंगलांचे आरक्षण रद्द करणे, वनजमिनींचा वापर वनेतर कारणासाठी करणे, वनजमीन भाडेतत्त्वावर किंवा दुसऱ्या मार्गाने खाजगी संस्थेला देणे आणि पुनर्वनीकरणाच्या उद्देशाने नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे तोडणे यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.
या विधेयकाविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1943061)
आगंतुक पटल : 839