विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा जम्मू प्रणेता ठरणार


जम्मूमधील  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा अफू संशोधन प्रकल्प हा कॅनडाच्या कंपनीसह भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे, ज्यात घातक पदार्थापासून मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त घटक बनवण्याची मोठी क्षमता आहे: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 23 JUL 2023 4:27PM by PIB Mumbai

 

भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा  जम्मू प्रणेता  ठरणार असल्याची  माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाच्या कंपनीसह सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत जम्मूमधील  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा अफूवरील संशोधन प्रकल्प हा भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे, ज्यात घातक पदार्थापासून मानवजातीच्या भल्यासाठी विशेषतः मज्जाविकार, कर्करोग आणि अपस्मारसारख्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त घटक बनवण्याची मोठी क्षमता आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा हा प्रकल्प आत्म-निर्भर भारताच्या दृष्टीकोनातून देखील महत्त्वाचा आहे कारण सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर, विविध प्रकारचे मज्जाविकार, मधुमेहाच्या वेदना इत्यादींसाठी निर्यात योग्य औषधे या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित केली जाऊ शकतात असं सिंह यांनी सांगितलं.

जम्मू आणि काश्मीर तसंच पंजाब अंमली पदार्थांच्या सेवनाने ग्रस्त असून अशा घातक पदार्थाच्या   अनेक व्याधी आणि इतर आजारांनी बाधित असलेल्या रुग्णांसाठी विविध औषधी उपयोगांबाबत अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे जनजागृती होईल असं डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची  भारतीय एकात्मिक औषध संस्था आणि इंडस स्कॅन यांच्या दरम्यान वैज्ञानिक करारावर स्वाक्षरी होणे केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक असून यामुळे आतापर्यंत परदेशातून निर्यात कराव्या लागणाऱ्या औषधांची निर्मिती करण्याची क्षमता निर्माण होईल असं डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुंतवणुकीला मोठ्या चालना प्रमाणावर मिळेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

अफू ही एक विस्मयजनक वनस्पती असून त्याच्यापासून बनवलेल्या मळमळ आणि वांतीवरील उपचारांसाठी मारिलनॉल/नॅबिलोन आणि सेसामेट, मज्जातंतूंच्या वेदना आणि मेंदूच्या पक्षाघातासाठी सेटिव्हेक्स, एपिडिओलेक्स, अपस्मारासाठी कॅनाबिडिओल या औषधांना अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे, ज्यांचा वापर इतर देशात केला जात आहे  अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

***

N.Chitale/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941946) Visitor Counter : 207