जलशक्ती मंत्रालय
पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्थापन केली जेजेएम डिजिटल अकादमी
पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या जेजेएम डिजिटल अकादमीचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2023 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे 21 आणि 22 जुलै रोजी भरलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि ECHO India यांच्यामध्ये जेजेएम डिजिटल अकादमी स्थापन करण्याबाबत सामंजस्य़ करार झाला.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या उपस्थितीमध्ये जेजेएम डिजिटल अकादमीच्या ऑनलाईन पोर्टलचा प्रारंभ केला.
जेजेएम डिजिटल अकादमीच्या स्थापनेसाठी ECHO India या ना-नफा या तत्वावर चालणाऱ्या संस्थेने विभागाला सहाय्य केले आहे. या अकादमीच्या माध्यमातून पाणीपुरवठा कार्यक्रमाशी संबंधित म्हणजे व्यवस्थापक, अभियंते, पंचायत कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, सफाई कामगार आणि तळापर्यंतच्या स्तरात काम करणाऱ्यांची क्षमता उभारणी करण्याचे उद्दिष्ट विभागाने समोर ठेवले आहे. त्यांना योजनेचे लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य यासह सुसज्ज करण्यासाठी अकादमी काम करेल. त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करेल.
हे ज्ञान सामाय़िक करताना ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून सर्व सत्रांचे रेकॉर्डिंग करुन त्यांचा संग्रह अकादमी तयार करणार आहे. त्याचा उपयोग भविष्यात संदर्भासाठी आणि संभाव्य शिकाऊ उमेदवारांसाठी होईल. संबधितांना प्रशिक्षण देण्यासाठी जेजेएम डिजिटल अकादमी मंचावर प्रमुख संसाधने केंद्रे आणि अंमलबजावणी सहाय्यक संस्था असतील. राष्ट्रीय आणि राज्य सरकारे देखील त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी सत्रे आयोजित करतील. संयुक्त राष्ट्रे आणि द्विपक्षीय संस्था, ट्रस्ट्स,फाऊंडेशन्स, संघटना आणि नागरी संस्था, या कार्यक्रमाला ज्ञान पुरवण्यासाठी एकत्र काम करतील. त्यांचे कॅलेंडर प्रकाशित करतील आणि क्षेत्रीय अधिकारी, ग्रामपंचायती कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचून योग्य जागी, योग्य वेळी, योग्य माहिती देतील.
जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी म्हणाले की, संबंधित, सरकार आणि समुदाय यांचे सामूहिक प्रयत्न घरांमध्ये पाणीपुरवठा शाश्वत ठेवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करेल. सामुहिक प्रयत्नांच्या या ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी जेजेएम डिजिटल अकादमी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1941923)
आगंतुक पटल : 197