संरक्षण मंत्रालय

डेहराडून येथील स्टेशन कँटीन आणि ईसीएचएस पॉलीक्लिनिकला आरआरएम यांची भेट

Posted On: 22 JUL 2023 7:48PM by PIB Mumbai

 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज 22 जुलै 2023 रोजी डेहराडून येथील स्टेशन कँटीन आणि ईसीएचएस पॉलीक्लिनिकला भेट देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला, तसेच उपाहारगृहातील सुविधांचा आढावा घेतला. ग्राहकांचे समाधान करण्यात वाढ करण्यासाठी तसेच विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांची प्रशंसा करून ते म्हणाले की देशातील सर्वच कँटीन्सनी ग्राहक समाधान किऑस्क तसेच अॅक्सेस कंट्रोल सॉफ्टवेअर बसविण्यासारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. अधिक उत्तम साहित्य व्यवस्थापन तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन यांसाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ईसीएचएस पॉलीक्लिनिकला देखील भेट दिली. माजी सैनिकांसाठी तेथे उभारण्यात आलेले विश्रांतीगृह संकुल पाहून ते प्रभावित झाले. या संकुलात नैसर्गिक प्रकाशयोजना आणि वायुवीजन यांचा वापर करताना हरित इमारतीचे सगळे नियम पाळण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी केलेल्या विशेष रचनेमुळे या संकुलातील शौचालयांच्या स्वच्छतेसाठी तसेच जलसंवर्धनासाठी आधुनिक पद्धतींचा वापर सोपा झाला आहे.

या पॉलीक्लिनिकमधील दोन नोंदणी काउंटरमध्ये वाढ करून सहा काउंटरची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था तसेच विनाअडथळा ऑनलाईन नोंदणी आणि रेफरल यांची प्रशंसा करून आरआरएम म्हणाले की रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी केलेल्या अशा प्रयत्नांमुळे देशासाठी आपल्या आयुष्यातील मोलाचा काळ समर्पित केलेल्या सैनिकांच्या मनोधैर्यात वाढ होत असते.

आरआरएम यांनी रुग्ण सुविधेच्या सर्व मापदंडाची नोंदणी करणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रुग्णसुविधांमध्ये आणि यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देऊ शकणाऱ्या प्रतिसाद किऑस्कची देखील प्रशंसा केली. ते म्हणाले की असे उपक्रम, त्याचबरोबर वयस्कर रुग्णांना एमएच आणि पॉलीक्लिनिक यांच्या दरम्यान सतत स्थलांतर करण्याची गरज टाळू शकणाऱ्या एमएचसह एलएएन स्थापन करण्यासाठीचा प्रकल्प यांचे अनुकरण इतर स्टेशन्सनी देखील करायला हवे.

***

M.Pange/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941801) Visitor Counter : 94


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu