अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 देशांचे वित्तमंत्री आणि  मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांची तिसरी बैठक


जी-20 फलनिष्पत्ती दस्तऐवज आणि अध्यक्षीय सारांश

Posted On: 18 JUL 2023 8:42PM by PIB Mumbai

 

जी-20 देशांचे सर्व वित्तमंत्री आणि  मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी परिशिष्ट 1 आणि 2 सह परिच्छेद 1,4 आणि परिच्छेद 6 ते 26 वर  सहमती दर्शवली  आहे.

1..आमच्या सर्व  जी-20 देशांचे वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांची  17-18 जुलै 2023 ला भारतात गांधीनगर इथे बैठक झाली. भारताच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एक वसुंधरा,एक कुटुंब,एक भविष्यया संकल्पनेअंतर्गत,आपल्या लोकांचे आणि वसुंधरेचे  कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी,सर्वांसाठी जागतिक विकासाला बळ देण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे सुकाणू भक्कम,शाश्वत, संतुलित आणि समावेशक विकासाकडे ( एसएसबीआयजी) नेण्यासाठीच्या आमच्या कटीबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.

2..1 2 फेब्रुवारी 2022 पासून आपण युक्रेनमधल्या  युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा अधिक प्रतिकूल परिणाम  पहात आहोत.या मुद्यावर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र आमसभा यासह इतर मंचावर मांडलेल्या राष्ट्रीय भूमिकेचा  आम्ही पुनरुच्चार केला. ज्याचा  2 मार्च 2022 तारखेला ठराव क्रमांक  ES- 11/1 बहुमताने ( ठरावाच्या बाजूने 141 मते,5 विरोधी,35 तटस्थ,12 अनुपस्थित ) स्वीकार करण्यात आला. त्यामध्ये रशियन फेडरेशनकडून युक्रेनविरोधात झालेल्या  आक्रमणाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत, युक्रेनच्या भूभागातून बिनशर्त आणि संपूर्ण  माघार घेण्याची मागणी करण्यात आली आहे. बहुतांश सदस्यांनी युक्रेनमधल्या युद्धाचा तीव्र निषेध करत अपार  मानवी यातनांसाठी ते कारणीभूत ठरत असून विकासाला खीळ घालत  जागतिक अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या नाजूक स्थितीत अधिक भर घालत आहे,चलन फुगवट्यात वाढ,पुरवठा साखळीत अडथळा,उर्जा आणि अन्न असुरक्षिततेत वाढ आणि आर्थिक स्थैर्यासाठीच्या धोक्यात अधिकच भर घालत आहे यावर जोर दिला. युद्ध परिस्थिती आणि निर्बंध याबाबत इतर विचार आणि वेगवेगळे मुल्यांकन होते.सुरक्षाविषयक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी जी-20 हा मंच नव्हे याचा स्वीकार करत  सुरक्षा विषयक मुद्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम जाणवू शकतो हे  आम्ही मान्य केले.   

3..आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता आणि स्थैर्य यांचे रक्षण करणाऱ्या बहुपक्षीय व्यवस्थेचे पालन करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये  समाविष्ट असलेल्या सर्व उद्देश आणि तत्वांचे पालन करणे आणि सशस्त्र संघर्षात  नागरिक आणि पायाभूत ढाचा यांचे रक्षण यासह आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे पालन करणे यांचा यात समावेश आहे. अण्वस्त्रांचा  वापर किंवा त्यांचा वापर करण्याची धमकी अस्विकारार्ह आहे.संघर्षावर शांततापूर्ण तोडगा,पेच प्रसंगावर तोडगा काढण्याचे प्रयत्न त्याचबरोबर  मुत्सदेगिरी आणि संवाद अतिशय महत्वाचा आहे. आजचे युग हे युद्धाचे युग असता कामा नये. 

1 भू-राजकीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जी-20 देशांचे वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांची   बैठक हा योग्य मंच नव्हे असे चीनने सांगितले.

2 परिच्छेद 2,3 आणि 5 मधील संदर्भामुळे हा दस्तावेज म्हणजे सामायिक फलनिष्पत्ती आहे, या स्थितीपासून रशियाने स्वतःला विलग केले. 

4.. जागतिक आर्थिक विकास दीर्घकालीन सरासरीच्या खाली आणि  असमान राहिला आहे.पुढच्या स्थितीबाबतही अनिश्चितता आहे.जागतिक आर्थिक   स्थिती लक्षणीयरित्या  ताठर बनली आहे त्यामुळे  कर्ज संकट  ,चलनफुगवटा आणि भू-आर्थिक तणाव  जारी राहण्याबरोबर  धोक्याचा तोल अधिकच ढासळता राहिला आहे.म्हणूनच विकासाला चालना देण्यासाठी,असमानता कमी करण्यासाठी आणि व्यापक  आर्थिक आणि वित्तीय स्थैर्य राखणाऱ्या उत्तम सुनियोजित वित्तीय,आर्थिक आणि संरचनात्मक धोरणांच्या आवश्यकतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. व्यापक धोरण सहकार्य वृद्धीगत करणे जारी राखण्याबरोबरच शाश्वत विकासासाठीच्या  2030 च्या अजेंड्याच्या  प्रगतीसाठी आम्ही पाठींबा जारी ठेवू. एसएसबीआयजी साध्य करण्यासाठी धोरणकर्त्यांना धोरण प्रतिसादात चपळ आणि लवचिक राहणे आवश्यक आहे यासाठी आम्ही पुन्हा दृढता दर्शवतो. नुकत्याच काही प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये बँकिंग विषयक डळमळीत स्थितीत संबंधित प्राधिकाऱ्यानी त्वरेने पाऊले उचलल्यामुळे वित्तीय स्थैर्य राखायला मदत झाली आणि  परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखता आली याची प्रचीती आली आहे. वित्तीय स्थिरता मंडळ (एफएसबी),मानक निर्धारण मंडळे (एसएसबीएस ) तसेच विशिष्ट न्यायक्षेत्राद्वारे  उचललेल्या प्रारंभिक पाऊलांचे  आम्ही स्वागत करतो जेणेकरून या बँकिंगविषयक डळमळीत स्थितीपासून आपण कोणता बोध घेऊ शकतो  आणि आपल्या  सध्याच्या कामात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ  शकते. नकारात्मक जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक तिथे व्यापक विवेकपूर्ण धोरणांचा आम्ही उपयोग करू.मध्यवर्ती बँका आपल्या संबंधित आदेशांना अनुरूप राहत किंमतीमध्ये स्थैर्य  साध्य करण्यासाठी कटीबद्ध आहेत.चलन फुगवटा उत्तम पद्धतीने    स्थिर राखण्याची सुनिश्चिती करत  आणि  त्याचा  नकारात्मक परिणाम देशांमध्ये पसरण्यापासून मर्यादित ठेवण्यासाठी सहाय्यक ठरणारी स्पष्ट धोरणात्मक  भूमिका आम्ही   संप्रेषित करू. धोरण विश्वासार्हता राखण्यासाठी मध्यवर्ती बँकेचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे. मध्यम कालावधीची  वित्तीय शाश्वतता राखताना गरीब आणि सर्वात जास्त दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी तात्पुरत्या आणि लक्ष्यीत वित्तीय  उपायांना आम्ही प्राधान्य देऊ.सर्वंकष वित्तीय आणि आर्थिक  भूमिका सुसंगत राहील याची सुनिश्चिती आम्ही करू.पुरवठा विषयक  धोरणे विशेषतः विकासाला चालना देण्यासाठी उत्पादकता वाढवणारी आणि किमतींचा दबाव कमी करण्यासाठी श्रम पुरवठा वाढवणाऱ्या धोरणांचे महत्व आम्ही ओळखले आहे. एप्रिल 2021 च्या विनिमय दर कटीबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. विकास आणि रोजगार निर्मिती पूर्ववत करण्यात,बचाववादाविरोधात लढा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार  करत, डब्ल्यूटीओमधल्या सुधारणांसाठी समन्वित प्रयत्नांना प्रोत्साहन देत जागतिक व्यापार संघटनेसमवेत   (डब्ल्यूटीओ) नियमाधारित,भेदभाव रहित, न्याय्य,खुल्या, ,समावेशक,शाश्वत आणि पारदर्शक बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या महत्वाचा आम्ही पुनरुच्चार करतो.

5.. जागतिक स्तरावर अन्न आणि उर्जेच्या गगनाला भिडणाऱ्या किमती खाली आल्या असल्या तरी जागतिक अर्थव्यवस्थेतली अनिश्चितता पाहता अन्न आणि उर्जा बाजारपेठेत उच्च पातळीवरच्या अनिश्चिततेची शक्यता कायम आहे. यासंदर्भात अन्न आणि उर्जा असुरक्षिततेचे व्यापक आर्थिक  परिणाम आणि जागतिक अर्थ व्यवस्थेवरील  त्याचा प्रभाव यावरच्या जी-20 अहवालाचे आम्ही  स्वागत करतो.सदस्यांनी सामायिक केलेले धोरणात्मक अनुभव आणि  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक समूह (डब्ल्यूबीजी),आंतरराष्ट्रीय उर्जा एजन्सी (आयईए) आणि अन्न आणि कृषी संस्था (एफएओ)यांच्या विश्लेषणाचा आधार त्याला लाभला असून त्याच्या ऐच्छिक आणि बंधनकारक नसलेल्या धोरणात्मक पद्धतींवर लक्ष पुरवावे लागेल. अन्न असुरक्षिततेविरोधात आयएफएडीच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठीया वर्ष अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) संसाधनांचेआयएफएडी सदस्य देशांकडून महत्वाकांक्षी पुनर्भरण होईल अशी आम्ही आशा करतो.

6..  शाश्वत, संतुलित आणि समावेशक विकास उद्दिष्टे अर्थात एसएसबीआयजी साठी व्यापक आर्थिक जोखमीच्या  मुल्यांकनाबाबतच्या चर्चेचीही  आम्ही दखल घेतली आहे. ज्यामध्ये हवामान बदलापासून ते देश निर्दिष्ट परिस्थितीनुरूप आणि विविध स्तरीय विकासानुरूप विविध संक्रमण धोरणांमधल्या जोखमीचा समावेश आहे.हवामान बदलाच्या  भौतिक परिणामांचा समग्र स्तरावर व्यापक आर्थिक खर्च महत्वाचा आहे आणि याबाबतच्या  निष्क्रियतेची किंमत योग्य आणि न्याय्य संक्रमणापेक्षा खूपच मोठी आहे. आंतरराष्ट्रीय संवाद आणि सहकार्याचे महत्व आम्ही जाणतो, यामध्ये वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह देश निर्दिष्ट परिस्थितीनुरूप वेळेवर धोरणात्मक कृतीचा यात समावेश आहे. विकास,चलन फुगवटा आणि बेरोजगारी यासह  हवामान बदल आणि संक्रमण धोरणांचा  भौतिक परिणाम यांच्या अल्प,मध्यम आणि दीर्घ कालीन व्यापक आर्थिक प्रभावाचे मुल्यांकन आणि लेखाजोखा महत्वाचा आहे. हवामान बदल आणि  संक्रमण मार्ग यामुळे निर्माण होणाऱ्या व्यापक आर्थिक जोखमीबाबत जी-20 अहवालाची आम्ही पुष्टी करतो.हा अहवाल,सदस्यांचे धोरणविषयक अनुभव आणि   आयएमएफ, आयईए आणि हरित अर्थप्रणालीसाठी मध्यवर्ती बँका आणि निरीक्षकांचे जाळे (एनजीएफएस) यांच्याकडून तंत्रविषयक माहिती द्वारा तथ्याधारीत मुल्यांकन करतो. या अहवालातल्या विश्लेषणावर  आधारित, विविध संबंधितांकडून माहिती घेत व्यापक अर्थव्यवस्थेच्या परिणामांवर आणखी काम करण्याबाबत  योग्य विशेषतः आर्थिक धोरणांशी सुसंगत विचार आम्ही करू.

7.. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांच्या विकासविषयक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सातत्याने लक्ष केंद्रित करण्यासह  21 व्या शतकातल्या जागतिक आव्हानांची दखल घेणाऱ्या बहुपक्षीय विकास बँका ( एमडीबी) अधिक बळकट आणि त्यांचा विकास करण्यासाठीच्या महत्वाकांक्षी प्रयत्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

8.. नोव्हेंबर 2022 मध्ये बाली इथले आमच्या नेत्यांचे मतैक्य आणि 2023च्या वसंत ऋतूमध्ये एमडीबी कडून मिळालेल्या अद्ययावत माहितीच्या आधारावर, एमडीबी भांडवल पर्याप्तता आराखडा (सीएएफएस)  यासाठी जी-20च्या या संदर्भातील  स्वतंत्र आढाव्याच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी एक   जी-20 आराखडा  विकसित करण्यात आला आहे. या आराखड्याला आमची सहमती असून एमडीबीच्या स्वतःच्या प्रशासन ढाच्यामध्ये, दीर्घकालीन वित्तीय शाश्वतता, मजबूत पतमानांकन आणि पसंतीचे ऋणदाता यासंदर्भातली सुरक्षितता  जपत या आराखड्याच्या महत्वाकांक्षी अंमलबजावणीचे आवाहन आम्ही करतो.एमडीबीसह विषय तज्ञ  आणि संबंधितांसह अंमलबजावणीच्या प्रगतीचा चक्राकार पद्धतीने नियमित आढावा घेण्याचे आवाहन आम्ही करतो.सीएएफ अर्थात भांडवल पर्याप्तता आराखडा शिफारसींच्या अंमलबजावणीत विशेषकरून जोखीम घेण्याच्या क्षमतेची व्याख्या आणि वित्तीय नवोन्मेश स्वीकारण्याच्या प्रगतीची आम्ही प्रशंसा करतो.त्याच वेळी  सीएएफ अंमलबजावणीला आणखी प्रोत्साहन  देण्याच्या आवश्यकतेवर आम्ही भर देतो.   जागतिक उदयोन्मुख बाजारपेठा (जीईएमएस) डाटा वेळेवर जारी करण्याबाबत आणि 2024 च्या सुरवातीला एकल एकक म्हणून  जीईएम 2. 0 सुरु करण्यासाठी  एमडीबी मधल्या सध्याच्या  सहयोगाची आम्ही प्रशंसा करतो.यापुढे जात  हायब्रीड भांडवल, कॉलेबल कॅपिटल आणि हमी यासारख्या क्षेत्रातही एमडीबीच्या सहयोगाला आम्ही प्रोत्साहन देतो. एमडीबी, पत मानांकन संस्था आणि भागधारक यांच्यातल्या वाढलेल्या  संवादाची आम्ही प्रशंसा करतो आणि माहिती आणि मानांकन पद्धती यांच्या देवाणघेवाणीत पारदर्शकता राखण्याला प्रोत्साहन देतो.अंमलबजावणी होत असलेल्या आणि विचाराधीन असलेल्या प्रारंभिक भांडवल पर्याप्तता आराखडा उपाययोजनांची आम्ही दखल घेतो,या उपाययोजना, जी -20 सीएएफ आराखड्यात वर्तवण्यात आलेल्या अनुमानानुसार येत्या दशकात सुमारे 200 अब्ज अमेरिकी डॉलर्स अतिरिक्त कर्ज प्रदान करण्याला वाव देण्याची शक्यता आहे.या प्रोत्साहनदायी पहिल्या पाऊलांनंतर आपल्याला सीएएफ अंमलबजावणीला सातत्यपूर्ण आणि अधिक चालना देण्याची आवश्यकता आहे. 

9.  तसेच , बहुस्तरीय विकास बँकेने (एमडीबी) त्यांचे दृष्टीकोन, प्रोत्साहनपर  संरचना, परिचालन दृष्टिकोन आणि आर्थिक क्षमता विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करावे या आमच्या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करतो, जेणेकरुन ते सातत्याने व्यापक जागतिक आव्हानांना  सामोरे जाण्यासाठी प्रभावी ठरण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी अधिक सुसज्ज असतील. 21 व्या शतकासाठी  बहुस्तरीय विकास बँक परिसंस्था मजबूत आणि विकसित करण्याची तातडीची गरज ओळखून, अहवालाचा पहिला खंड तयार करण्यासाठी एमडीबी  मजबूत करण्याबाबत जी- 20 च्या  स्वतंत्र तज्ञ गटाच्या प्रयत्नांची आम्ही  प्रशंसा करतो आणि  ऑक्टोबर 2023 मध्ये अपेक्षित असलेल्या दुसऱ्या खंडाच्या पार्श्वभूमीवर  त्याचे आम्ही परीक्षण करू. आम्ही खंड 1 च्या शिफारशींची नोंद घेऊ  आणि बहुस्तरीय विकास बँकेची परिणामकारकता वाढविण्याच्या दृष्टीने  योग्य वेळी, त्यांच्या प्रशासनाच्या चौकटीत, या शिफारशींवर चर्चा करण्याबाबत ते  निर्णय घेऊ  शकतात. बहुस्तरीय विकास बँकेची आर्थिक क्षमता बळकट करण्यासाठी ऑक्टोबर 2023 मधील  चौथ्या वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नरांच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर  एका उच्च-स्तरीय चर्चासत्राची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आम्ही बहुस्तरीय विकास बँकांना  जागतिक आव्हानांना चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी त्यांच्या प्रगतीच्या प्रयत्नांबाबत आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यगटाला (IFA WG) अद्यतनित करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्ही जागतिक बँक समूहाच्या उत्क्रांतीसंदर्भातील  मार्च 2023 च्या अहवालाचे स्वागत करतो आणि जागतिक बँकेला मान्य केलेल्या कृतींची अंमलबजावणी पुढे नेण्यासाठी आणि मॅराकेश  मध्ये IMF/WBG 2023 वार्षिक बैठकीत बँकेच्या वाढीसंबंधी  महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी योगदान देणारे पुढील प्रस्ताव विकसित करण्याचे आवाहन करतो. या क्षेत्रातील इतर बहुपक्षीय प्रयत्न लक्षात घेऊन आम्ही नवीन जागतिक वित्तपुरवठा करारासंदर्भातील  शिखर परिषदेची दखल घेतो. आम्ही महत्त्वाकांक्षी आयडीए 21 पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा करतो. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (IBRD) च्या 2020 शेअरहोल्डिंग रिव्ह्यू वरील अंतिम अहवाल आम्ही स्वीकारतो आणि 2025 शेअरहोल्डिंग रिव्ह्यूसाठी उत्सुक  आहोत.

10. आम्ही जागतिक आर्थिक सुरक्षितता जाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मजबूत, कोटा-आधारित आणि पुरेशा प्रमाणात संसाधने असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी   आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.  आम्ही पर्याप्त कोट्यासाठी  आणि 16 व्या साधारण आढावा कोटाच्या (GRQ) अंतर्गत मार्गदर्शक म्हणून नवीन कोटा सूत्रासह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रशासन सुधारणा  प्रक्रिया सुरू ठेवू आणि 15 डिसेंबर 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संसाधनांमध्ये कोट्याची प्राथमिक भूमिका सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या संदर्भात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा वर्तमान संसाधन साठा  राखण्याचे आम्ही समर्थन करतो. आम्ही  100 अब्ज अमेरिकन डॉलर्स ऐच्छिक योगदानाच्या (एसडीआर  किंवा समतुल्य) आणि सर्वात जास्त गरज असलेल्या देशांसाठी 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मूल्याच्या  अनुदानाच्या  जागतिक महत्त्वाकांक्षेचे स्वागत करतो आणि प्रलंबित आश्वासनांची  जलद पूर्तता करण्याची  मागणी करतो.  रिझिइलेंस अँड सस्‍टेनेबिलिटी ट्रस्ट (RST) साठी सुमारे  45.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि गरीबी निवारण आणि विकास  ट्रस्ट (PRGT ) साठी सुमारे 24.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मूल्याची  कर्ज संसाधने आणि एसडीआर च्या माध्यमातून सुमारे 1.9 अमेरिकन डॉलर्स अनुदानासह  रिझिइलेंस अँड सस्‍टेनेबिलिटी ट्रस्ट आणि गरीबी निवारण आणि विकास  ट्रस्ट  अंतर्गत साध्य  प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. पहिल्या टप्प्यातील PRGT निधी उभारणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मराकेश मध्ये  IMF/WBG 2023 च्या वार्षिक बैठकीद्वारे PRGT ला अधिक  स्वैच्छिक अनुदान आणि कर्ज आश्वासनाची  मागणी करतो. आगामी वर्षांमध्ये अल्प- उत्पन्न असलेल्या देशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने PRGT ला शाश्वत स्तरावर  ठेवण्याच्या  पर्यायांबाबत  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 2023 IMF/WBG वार्षिक बैठकीपर्यंत प्राथमिक विश्लेषण देईल अशी आम्ही अपेक्षा करतो. G20 देश  हे आफ्रिकेला निरंतर पाठिंबा देत असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, ज्यात आफ्रिकेसोबतच्या G20 कराराचाही समावेश आहे. आम्ही मजबूत बाह्य स्थिती असलेल्या देशांकडून एसडीआर किंवा समतुल्य योगदानाच्या  प्रगतीचे निरीक्षण करणे सुरू ठेवू आणि सप्टेंबरमध्ये एसडीआरच्या वापराबाबत आयएमएफ  एक्स-पोस्ट अहवालाची प्रतीक्षा करू. आम्ही आरएसटी समर्थित कार्यक्रमांच्या परिणामकारकतेवर देखरेख ठेवणे सुरू ठेवू आणि एप्रिल 2024 साठी निर्धारित  अंतरिम आढाव्याची प्रतीक्षा करू.  आम्ही संबंधित कायदेशीर चौकटींचा आणि जतन करण्याच्या गरजेचा आदर  करत एमडीबीच्या माध्यमातून एसडीआर वळवण्यासाठी आरक्षित संपत्ती आणि एसडीआर स्थितीबाबत  व्यवहार्य पर्यायांच्या शोधात पुढील प्रगतीसाठी उत्सुक आहोत . आम्ही सावधगिरीच्या व्यवस्थेच्या (FCL, PLL आणि SLL) पुनरावलोकनाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आयएमएफ अधिभार धोरणावर झालेल्या चर्चेची दखल घेऊ.

11. मध्यवर्ती बँक डिजिटल चलन  (CBDCs) ची सुरुवात  आणि स्वीकारातून उद्भवणाऱ्या विशेषत: सीमेपलीकडील पेमेंट तसेच आंतरराष्ट्रीय चलन आणि वित्तीय प्रणालीवरील संभाव्य व्यापक -आर्थिक परिणामांवरील चर्चेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही सीबीडीसी च्या अंमलबजावणीनंतर मिळालेल्या अनुभवावर आधारित  बीआयएस इनोवेशन हब (BISIH) अहवालाचे स्वागत करतो आणि या मुद्द्यावर चर्चा पुढे नेण्यासाठी सीबीडीसीचा  व्यापक अवलंब करण्याच्या संभाव्य व्यापक आर्थिक परिणामांवरील आयएमएफ  अहवालाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. आम्ही मूळ उद्देश ध्यानात घेऊन आयएमएफ, ओईसीडी आणि बीआयएस द्वारे धोरण अद्यतनांच्या आधारे भांडवल ओघातील अस्थिरता दूर  करण्यासाठी विविध साधनांच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय चौकटीच्या  अंमलबजावणीवर सातत्याने चर्चा करण्यास उत्सुक आहोत. शाश्वत भांडवली ओघ  प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. यासाठी, आम्ही ओईसीडीच्या सुव्यवस्थित हरित संक्रमणाकडे - गुंतवणूक आवश्यकता आणि भांडवली प्रवाहासाठी जोखीम व्यवस्थापित करण्यावरील अहवालाची दखल घेतो.

12. अल्प आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील कर्ज संकट प्रभावी, सर्वसमावेशक आणि पद्धतशीर पद्धतीने दूर करण्याच्या महत्त्वावर आम्ही पुन्हा भर देतो. 13 नोव्हेंबर 2020 रोजी सहमती झाल्याप्रमाणे, दुसऱ्या आणि अंतिम परिच्छेदासह डीएसएसआयच्या पलिकडील कर्जासाठी सामायिक आराखड्यातील सर्व वचनबद्धतेवर आम्ही कायम आहोत आणि सामान्य आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध, व्यवस्थित आणि समन्वित पद्धतीने पुढे नेऊ. यासाठी, आम्ही G20 आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यगटाला (IFA WG) समान आराखड्याच्या अंमलबजावणीशी निगडीत धोरण-संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवण्यास आणि योग्य शिफारशी करण्यास सांगतो. कर्जासंदर्भात झांबिया सरकार आणि अधिकृत कर्जदार समिती यांच्यात अलिकडेच  झालेल्या कराराचे आम्ही स्वागत करतो आणि त्याच्या जलद निराकरणाची अपेक्षा करतो. घानासाठी अधिकृत कर्जदार समितीच्या स्थापनेचे आम्ही स्वागत करतो आणि शक्य तितक्या लवकर कर्ज व्यवस्थापन संबंधी कराराची अपेक्षा करतो. इथिओपियाच्या कर्ज व्यवस्थापन संदर्भात त्वरित तोडगा  काढण्याचे आम्ही आवाहन करतो.  समान आराखड्याच्याच्याही पुढे जाऊन आम्ही अधिकृत कर्जदार समितीच्या स्थापनेसह, श्रीलंकेच्या कर्ज परिस्थितीचे वेळेवर निराकरण करण्यासाठी सर्व प्रयत्नांचे स्वागत करतो आणि याबाबत शक्य तितक्या लवकर निराकरण करण्याचे आम्ही आवाहन करतो. जागतिक ऋण स्थितीबाबत G20 देशांचे  निवेदन निष्पक्ष आणि  व्यापक पद्धतीने  विकसित करण्याचे काम लक्षात घेऊन, आम्ही G20 IFA WG ला विकास वेगाने सुरू ठेवण्याचे आवाहन करतो. प्रभावी कर्ज व्यवस्थापन  सुलभ करण्यासाठी आम्ही जागतिक सार्वभौम कर्ज गोलमेज (GSDR) सहभागींच्या संवाद  मजबूत करण्यासाठी आणि समान आराखड्याच्या  आतील आणि बाहेरील  दोन्ही प्रमुख हितधारकांमध्ये साधारण  समज वाढवण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो.

13. कर्ज पारदर्शकता वाढविण्याच्या दिशेने काम सुरु ठेवण्यासाठी खाजगी कर्जदारांसह सर्व हितधारकांच्या संयुक्त प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांसोबत डेटा शेअरिंगच्या ऐच्छिक स्टॉकटेकिंग पद्धतीचे  परिणाम लक्षात घेतो. आम्ही खाजगी क्षेत्रातील कर्जदारांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो ज्यांनी आधीच संयुक्त आंतरराष्ट्रीय वित्त संस्था (IIF)/OECD डेटा रिपॉझिटरी पोर्टलमध्ये डेटाचे योगदान दिले आहे आणि इतरांना देखील स्वेच्छा आधारावर योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.

14. उद्याची शहरे सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत बनविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आम्ही वित्त संसाधनांचे वर्धित एकत्रीकरण आणि विद्यमान संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या गरजेवर भर देतो. यासाठी, आम्ही उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा करण्याच्या G20 तत्त्वांचे ,जे स्वैच्छिक आणि अ -बंधनकारक आहेत आणि उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा करण्यावरील G20/OECD अहवाल, जो वित्तपुरवठा धोरण प्रदान करतो तसेच अभिनव शहरांचे  संकलन सादर करतो, त्याचे समर्थन करतो. आम्ही विकास वित्तीय संस्था आणि एमडीबी  सह भागधारकांना, जेथे लागू असेल तेथे शहरी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि वित्तपुरवठा करताना या तत्त्वांचा आधार घेण्याच्या संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी आणि सुरुवातीच्या प्रायोगिक  प्रकरणांचे अनुभव सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्ही सर्वसमावेशक शहरांच्या सक्षमीकरणाची रूपरेषा तयार करण्यामधील प्रगतीकडे लक्ष देतो.  आम्ही सार्वजनिक सेवांच्या प्रभावी वितरणासाठी स्थानिक सरकारांना त्यांच्या एकूण संस्थात्मक क्षमतेचे मूल्यांकन आणि ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शहरी प्रशासनाच्या क्षमता वाढीसाठी सानुकूल  G20/ADB आराखड्यावरही लक्ष देतो. आम्ही ऐच्छिक आणि अ-बंधनकारक गुणवत्ता पायाभूत गुंतवणूक (QII) निर्देशांकाच्या विद्यमान प्रायोगिक विनंतीकडे  लक्ष देतो आणि देशातील परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मागणीवरील  पुढील चर्चेची अपेक्षा करतो. 2014 पासून G20 च्या बहु-वर्षीय पायाभूत सुविधा कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर हबचे आभार मानतो. आम्हाला माहित आहे की जीआयएच  बोर्ड आणि हितधारक सध्‍या त्यांनी आत्तापर्यंत निर्माण केलेले महत्व कायम  ठेवण्‍याचा मार्ग शोधत आहेत. उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा करण्यासाठी धोरणे आखताना खाजगी क्षेत्राचा दृष्टीकोन एकत्रित करण्यावर केंद्रित  2023 पायाभूत गुंतवणूकदार संवादाच्या निष्कर्ष अहवालाची आम्ही प्रतीक्षा करत  आहोत.

15.     संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक आराखडा परिषदेत (UNFCCC) निश्चित झालेल्या आराखड्याची तसेच पॅरिस कराराची संपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करणे या विषयी आमची कायमस्वरूपी काटिबद्धता पुढेही कायम राहणार आहे. विकसित देशांनी 2020 पर्यंत, दरवर्षी, एकत्रितपणे 100 अब्ज डॉलर्स चा निधी एकत्र करण्याच्या  तसेच, 2025 पर्यंत अर्थपूर्ण संकट निवारण आणि अंमलबजावणीत पारदर्शकता  आणण्याच्या संदर्भात, दरवर्षी, विकसनशील देशांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या वचनबद्धतेचे आम्ही स्मरण करत आहोत, आणि त्याचा पुनरुच्चारही करत आहोत. विकसित देश- यात योगदान देणाऱ्या देशांना, आज पहिल्यांदाच हे उद्दिष्ट 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याच संदर्भात, आम्ही विकसनशील देशांना समर्थन देण्यासाठी दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी नवीन सामूहिक परिमाणित उद्दिष्टावर सतत चर्चा करण्यास समर्थन देत आहोत. हा प्रस्ताव, युनएफसीसीसी  (UNFCCC) चे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आणि पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यास उपयुक्त ठरेल.

16.     देशाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने संक्रमण विषयक घडामोडींना पाठिंबा देणे सुनिश्चित करताना, हवामान बदलासाठीचा निधीचा योग्य वेळेत पुरवठा आणि आणि संसाधनांच्या एकत्रीकरणासाठी यंत्रणांविषयी, शाश्वत वित्त कार्य गटाचे केलेल्या (SFWG) शिफारशींचे आम्ही स्वागत करतो.  यात, सार्वजनिक निधीची असलेली महत्वाची भूमिका देखील आम्ही लक्षात घेतली आहे.  अत्यंत गरजेच्या असलेल्या, खाजगी वित्तपुरवठा व्यवस्था, विविध वित्तीय साधनांच्या एकत्रीकरणा करत, हवामान विषयक बदलाचे वाहक होण्यात, सार्वजनिक निधीची भूमिका महत्वाची आहे. त्याशिवाय, यंत्रणा आणि जोखीम -सामाईक करू शकणाऱ्या सुविधा, तसेच, विविध राष्ट्रीय परिस्थितींचा विचार करून महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय निर्धारीत योगदान (एनडीसी), कार्बन तटस्थता आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी समतोल रीतीने अनुकूलन आणि समस्या कमी करणे अशा दोन्हीसाठी देखील, त्याचे महत्त्व आहे. म्हणूनच, मिश्र विधी व्यवस्था आणि जोखीम वाटून घेण्याच्या सुविधा वाढवण्यासाठीच्या शिफारसींचे आम्ही स्वागत करतो. यात, हवामान बदलविषयक निधी एकत्रित करण्यात, एमडीबीच्या विस्तारीत भूमिकेचाही आम्ही विचार केला आहे.

विकसनशील देशांकडून पॅरिस कराराच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी बहुपक्षीय हवामान निधीसारख्या सवलतीच्या संसाधनांचा प्रभाव वाढविण्याचे महत्त्व आम्ही अधोरेखित करतो आणि यावर्षी हरित हवामान निधी(GCF) च्या महत्त्वाकांक्षी भरपाईची अपेक्षा करतो. हरितगृह वायू उत्सर्जन टाळणार्‍या, कमी करणार्‍या आणि काढून टाकणार्‍या आणि त्याचा अनुकूल व्यापार  सुलभ करणार्‍या सुरुवातीच्या टप्प्यातील तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला पाठिंबा देण्याचे महत्त्व ओळखून, आम्ही जलद विकास, प्रात्यक्षिक आणि  हरित तसेच कमी-कार्बन तंत्रज्ञानाचा वापर, अधिक खाजगी प्रवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक उपाय, धोरणे आणि प्रोत्साहन यासाठी करण्यात आलेल्या शिफारसी लक्षात घेतल्या आहेत. वित्तीय, बाजारपेठा तसेच नियामक यंत्रणा, या सर्वांचा समावेश असलेले मिश्रित धोरण महत्वाचे असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो. शाश्वत गुंतवणुकीला पाठबळ देण्यासाठी, नॉन प्राईसिंग म्हणजे, मूल्य व्यतिरिक्त धोरण साधनांचा समावेश असलेल्या संग्रहाला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी आम्हाला आशा आहे.

17. शाश्वत वित्तपुरवठा वाढवण्यासाठी कृती करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. जी-20 च्या शाश्वत वित्त आराखडयाच्या धर्तीवर, आम्ही शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न वित्तपुरवठ्यासाठी विश्लेषणात्मक आराखड्याचे आम्ही स्वागत करतो. त्यासोबतच, सामाजिक प्रभाव विषयक गुंतवणूक साधन म्हणून त्याचा अंगीकार वाढवण्याच्या तसेच त्यात त्या देशातील परिस्थितीनुसार, साठा विश्लेषकांनी निसर्ग आधारित डेटा आणि त्याचे वृत्तांकन सुधारण्याच्या स्वयंस्फूर्त शिफारसीचे देखील आम्ही स्वागत करतो.  सर्व संबंधित हितधारकांनी आपल्या कृतीत या शिफारसींचा विचार करावा आणि 2030 च्या अजेंडयाला पाठबळ द्यावे, याला आम्ही प्रोत्साहन देत आहोत.

18.  जी-20 बहुवार्षिक तंत्रज्ञान सहाय्यक कृती आराखड्याचे (TAAP) देखील आम्ही स्वागत करतो. आणि हवामान बदल विषयक गुंतवणुकीत डेटाशी संबंधित येणारे अडथळे दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या स्वयंस्फूर्त शिफारसींचेही आम्ही स्वागत करतो. संबंधित राष्ट्रांमधील परिस्थितीनुसार, तिथल्या यंत्रणांनी आणि हितसंबंधियांनी या कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. स्वेच्छा आणि लवचिक स्वरूपाच्या  जी -20 शाश्वत वित्त आराखड्याच्या अंमलबजावणीविषयीसदस्य, आंतरराष्ट्रीय संस्था, नेटवर्क आणि इतर उपक्रमांनी केलेल्या प्रगतीचा अहवाल देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच ह्या आराखड्यात शिफारस करण्यात आलेल्या कृतींच्या दिशेने वाटचाल करावी, जेणेकरुन, शाश्वत वित्तपुरवठ्यात वाढ करता येईल, ज्यात संक्रमण वित्तीय आराखड्याच्या अंमलबजवाणीचाही समावेश आहे. त्याशिवाय, 2023 जी-20 शाश्वत वित्त अहवाला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशीही आमची अपेक्षा आहे. यातही जी-20 शाश्वत वित्त आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणेही अभिप्रेत आहे.

इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड्स बोर्ड (ISSB) द्वारे जून 2023 मध्ये प्रकाशित शाश्वतता आणि हवामान-संबंधित मानकांच्या जाहीर स्वरूपाला, अंतिम रूप देण्याचे आम्ही स्वागत करतो, ही मानके, समान- अनुपाताशी संबंधित समस्यांवर उपाय शोधणारी आणि परस्पर कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारी यंत्रणा प्रदान करतात.

मात्र अशा मानकांनुसार अंमलबजावणी करतांना त्या त्या देशातील स्थळ काल परिस्थितीनुसार त्यात लवचिकता ठेवली जाणे महत्वाचे आहे. जेव्हा आपण वरीलप्रमाणे, त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत लागू करू, त्यावेळी ती मानके जगभरातून आपल्याला तुलनात्मक आणि अधिक विश्वासार्ह निष्कर्ष मिळू शकतील.

18.     संयुक्त वित्त आणि आरोग्य कृती दलाअंतर्गत (JFHTF), वित्त आणि आरोग्य मंत्रालयांमधील समन्वय वाढवत, महामारीला प्रतिबंध करणे, त्याची सज्जता आणि प्रतिसाद, यासाठीची जागतिक आरोग्य संरचना अधिक भक्कम आणि मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या कृतीदलाअंतर्गत, आम्ही इथे आमंत्रित काही महत्वाच्या प्रादेशिक संघटनांचे कृती दलाच्या बैठकीत स्वागत करतो. ह्या संस्था, कमी उत्पन्न असलेल्या देशांचा आवाज अधिक बुलंद करणाऱ्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO), जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपियन गुंतवणूक बँक (EIB) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आर्थिक भेद्यता आणि जोखीम (FEVR) वरील फ्रेमवर्क आणि साथीच्या रोगांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक भेद्यता आणि जोखमींवरील प्रारंभिक अहवालाचे आम्ही स्वागत करतो. देश-विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन विकसित होत असलेल्या महामारीच्या धोक्यांमुळे आर्थिक असुरक्षा आणि जोखमींचे नियमितपणे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही कृतीदलाला त्याच्या बहु-वर्षीय कार्य योजनेवर या आराखड्याची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचे आवाहन करतो आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेने विकसित केलेल्या (मॅपिंग पॅन्डेमिक रिस्पॉन्स फायनान्सिंग ऑप्शन्स म्हणजेच, महामारीच्या काळात वित्तीय मदतीचा मागोवा आणि त्यात आढळलेल्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो तसेच, आवश्यक वित्तपुरवठा त्वरीत तैनात करण्यासाठी वित्तपुरवठा यंत्रणेचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कसा वापर केला जाऊ शकतो, अधिक समन्वय कसा निर्माण केला जाऊ शकतो.  तसेच इतर जागतिक मंचांवरील चर्चांचा योग्य विचार करून त्यात आणखी वाढ कशी करता येईल, यावर पुढील चर्चा होण्याची अपेक्षा करतो. या तीन अहवालांमधून मिळालेल्या निष्कर्षातून, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या वित्त आणि आरोग्य मंत्रीस्तरावरील संयुक्त बैठकीत, सखोल चर्चा केली जाईल. ज्यात, प्रामुख्याने, भविष्यातील महामारीच्या धोक्याला जागतिक स्तरावर कसा प्रतिसाद मिळेल, यावर भर असेल. आम्ही महामारी निधीद्वारे प्रस्ताव मागवल्याच्या निष्कर्षाचे स्वागत करतो आणि येत्या काही महिन्यांत निधीच्या पहिल्या फेरीची वाट पाहत आहोत.

19.     21 व्या शतकातील गरजांना अनुसरून जागतिक स्तरावर न्याय्य, शाश्वत आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय कर प्रणालीसाठी सहकार्य सुरू ठेवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.

बहुराष्ट्रीय बैठकीचा (MLC) आराखडा तयार करण्याच्या वेळी अमुक रक्कम, त्या  महत्त्वपूर्ण प्रगतीच्या टप्प्यावर अमुक रक्कम, आणि काम संपल्यानंतरच्या टप्प्यांत, कर नियमाच्या (STTR) विषयाच्या विकासावरील आणि OECD/G20 समावेशी FPSBE आराखड्यात  (OECD/G20 सर्वसमावेशक आराखडा ) जुलै 2023 च्या निकाल विधानात नमूद केल्यानुसार त्याच्या अंमलबजावणी आराखड्याचे स्वागत करतो.

2023 च्या उत्तरार्धात स्वाक्षरीसाठी बहुराष्ट्रीय बैठकीचा आराखडा (MLC) तयार करण्यासाठी आणि 2023 च्या अखेरीस दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सर्वसमावेशक आराखड्याशी संबंधित काही प्रलंबित समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आवाहन करतो. ग्लोबल अँटी-बेस इरोशन (GloBE) नियम एक सामान्य दृष्टीकोन म्हणून लागू करण्यासाठी विविध देशांनी उचललेल्या पावलांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही द्वि-स्तंभावर आधारित आंतरराष्ट्रीय कर पॅकेजची प्रभावी अंमलबजावठी  करण्यासाठी क्षमता वाढीसाठीच्या समन्वित प्रयत्नांची गरज ओळखतो. त्यातही विशेषतः, विकसनशील देशांसाठी अतिरिक्त समर्थन आणि तांत्रिक सहाय्यासाठी योजनेचे स्वागत करतो. OECD च्या सहकार्याने कर आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी भारतात दक्षिण आशिया अकादमीच्या पायलट प्रोजेक्टचे आम्ही स्वागत करतो. विकसनशील देश आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणीवरील G20/OECD आराखड्यात  काळानुरूप झालेले आधुनिकीकरण आम्ही लक्षात घेतले आहे. पारदर्शकता आणि कर उद्देशांसाठी माहितीची देवाणघेवाण (ग्लोबल फोरम) साठीच्या  जागतिक मंचाद्वारे विकसनशील देशांसाठी माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्याच्या क्षमतेबाबत 2021 च्या रणनीतीच्या  अंमलबजावणीत काळानुरूप बदल झाले आहेत, याचीही आम्ही नोंद घेतली आहे. आम्ही क्रिप्टो-अॅसेट रिपोर्टिंग फ्रेमवर्क (CARF) ची जलद अंमलबजावणी आणि CRS मधील सुधारणांसाठी आवाहन करतो. आम्ही ग्लोबल फोरमला 2027 पर्यंत CARF एक्स्चेंज सुरू करण्याच्या या मोठ्या संख्येच्या आकांक्षा लक्षात घेऊन संबंधित अधिकारक्षेत्रांद्वारे देवाणघेवाण सुरू करण्यासाठी योग्य आणि समन्वित टाइमलाइन ओळखण्यास सांगतो आणि त्याच्या कामाच्या प्रगतीबद्दल आमच्या भविष्यातील बैठकांना अहवाल देण्यास सांगतो. आम्ही रिअल इस्टेटवरील आंतरराष्ट्रीय कर पारदर्शकता वाढविण्यावरील OECD अहवाल आणि कर-नसलेल्या उद्देशांसाठी कर-संधि-विनिमय माहितीचा वापर सुलभ करण्यावरील ग्लोबल फोरम अहवालाची नोंद करतो. करचोरी, भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगचा मुकाबला करण्यासाठी जी-20 उच्च-स्तरीय कर परिसंवादात झालेल्या चर्चेची आम्ही नोंद घेतो.

20.  आम्ही क्रिप्टो-मालमत्ता इकोसिस्टममधील वेगवान विकासाच्या जोखमींचे बारकाईने निरीक्षण करणे सुरू ठेवतो. तसेच क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित घडामोडी  आणि बाजारपेठांचे नियमन, पर्यवेक्षण आणि देखरेख आणि जागतिक स्टेबलकॉइन व्यवस्थेसाठी वित्तीय स्थिरता मंडळाच्या (FSB's) उच्च-स्तरीय शिफारसींना आम्ही मान्यता देत आहोत. आम्ही FSB आणि मानक-सेटिंग संस्थांना (SSBs) नियामक लवाद टाळण्यासाठी जागतिक स्तरावर या शिफारशींच्या प्रभावी आणि वेळेवर अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करतो . आम्ही क्रिप्टो मालमत्तेसाठी सामायिक केलेल्या एफएसबी आणि एसएसबी च्या कृतियोजनेचे स्वागत करतो.  सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेपूर्वी आराखड्यासह IMF-FSB सिंथेसिस पेपर प्राप्त करण्यास आम्ही उत्सुक आहोत, ज्याद्वारे जोखीमांची संपूर्ण श्रेणी आणि उदयोन्मुख बाजारपेठासाठी विशिष्ट जोखीम लक्षात घेऊन समन्वित आणि सर्वसमावेशक धोरण आणि नियामक आराखड्याला पाठिंबा देता येईल. तसेच बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था (EMDEs) शी संबंधित विशेष जोखीममनी लाँडरिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा जोखमींचे निराकरण करण्यासाठी FATF मानकांची चालू असलेली जागतिक स्तरावरील अंमलबजावणी, याच संदर्भात, आम्ही प्रेसिडेन्सी नोट ही  सिंथेसिस पेपरसाठी महत्त्वाची माहिती  म्हणून लक्षात घेतो. आम्ही क्रिप्टो व्यवस्था : मुख्य घटक आणि जोखीम यावरील BIS च्या अहवालाचे स्वागत करतो.

22. आम्ही एनबीएफआयमध्ये होणाऱ्या घडामोडींवर देखरेख ठेवून एका प्रणालीगत दृष्टीकोनाच्या माध्यमातून बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थतेची(NBFI) लवचिकता वाढवण्यासाठी आणि  असुरक्षितता दूर करण्यासाठी एफएसबी आणि एसएसबी यांना भक्कम पाठबळ देणे सुरू ठेवू. आम्ही एफएसबी 2017मधील खुल्या निधीमधील तरलता विसंगती दूर करण्यासाठीच्या सुधारणांसंदर्भातील एफएसबीच्या सल्लामसलत अहवालाचे स्वागत करतो  आणि एफएसबी मनी मार्केट फंड प्रपोजलच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेल्या कामाला पाठबळ देतो, मार्जिनिंग पद्धती वाढवतो आणि बिगर बँकिंग व्यवस्थेमधील असुरक्षितता दूर करतो. सायबर प्रकरणांची माहिती, सायबर लेक्सिकॉनमधील अद्ययावत माहिती आणि एका घटनांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी (FIRE) एका प्रारुपाविषयीचे संकल्पनापत्र यामध्ये जास्तीत जास्त अभिसरण साध्य करण्याच्या एफएसबीच्या शिफारशींचे आम्ही स्वागत करतो. आम्ही रिपोर्टिंगच्या गरजा ओळखण्यासाठी आणि (FIRE) विकसित करण्याची व्यवहार्यता  आणि पूर्वअटी विचारात  घेण्यासाठी एफएसबीच्या कार्याकडे पाहात आहोत आणि योग्य त्या कालमर्यादेसह एक कृती योजना तयार करण्याची एफएसबीला विनंती करत आहोत.

23. आम्ही तृतीय-पक्ष जोखीम व्यवस्थापन आणि दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यावरील एफएसबीच्या सल्लामसलत अहवालाचे स्वागत करतो. या साधनसामग्रीमुळे वित्तीय संस्थांची परिचालनात्मक प्रतिरोधकता वाढण्याची, मोठ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांसह त्रयस्थ-पक्षावरील त्यांच्या वाढत्या अवलंबित्वामधून निर्माण होणाऱ्या आव्हानांचे निराकरण करण्याची, त्याचबरोबर वित्तीय सेवा क्षेत्राच्या विविध भागांमध्ये आणि विविध अधिकारक्षेत्रांमध्ये नियामक आणि पर्यवेक्षक स्वरुपाच्या दृष्टीकोनातील तुटकपणा कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सीमेपलीकडील पेमेंट्समध्ये वाढ करण्यासाठी जी20च्या पुढील टप्प्यात प्राधान्यक्रमाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि या दिशेने एसएसबी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतो. या संदर्भात आम्ही या आराखड्याच्या अंमलबजावणीवरील ऑक्टोबरमधील एफएसबीच्या प्रगती अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. सीमेपलीकडील पेमेंट्समध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने तयार होणाऱ्या नवोन्मेषी उपायांना चालना देणाऱ्या जी20 टेकस्प्रिंट 2023 या संयुक्त उपक्रमाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या वित्तीय जोखीमांना तोंड देण्यासाठी एफएसबीच्या आराखड्यावरील वार्षिक प्रगती अहवालाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही भांडवली बाजारातून वित्तपुरवठा करण्यासाठी शाश्वतता आणि सुविधांना पाठबळ देणाऱ्या, कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी धोरण आणि नियामक फ्रेमवर्क बळकट करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या सुधारित जी20/ओईसीडी सिद्घांतांचा पुरस्कार करतो, ज्या व्यापक अर्थव्यवस्थेच्या प्रतिरोधकतेमध्ये योगदान देऊ शकतील.

24. आम्ही जी20 2020 वित्तीय समावेशन कृती योजना (FIAP) अंतर्गत उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दिशेने वित्तीय समावेशनाच्या जागतिक भागीदारीने केलेल्या प्रगतीचे स्वागत करतो. जी20 निधीपुरवठा लक्ष्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीबाबत नेत्यांना दिलेल्या ताज्या माहितीचे आम्ही स्वागत करतो आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीव डिजिटल वित्तीय समावेशनासाठी नियामक साधनाचा पुरस्कार करतो. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून वित्तीय समावेशन आणि आणि उत्पादकतेच्या लाभात वाढ करण्यासाठी आम्ही ऐच्छिक आणि बंधनकारक नसलेल्या जी 20 धोरण शिफारशींचा पुरस्कार करतो. समावेशक वृद्धी आणि शाश्वत विकासाला पाठबळ देण्यासाठी आर्थिक समावेशनाला पुढे नेण्यात मदत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आम्ही दखल घेतो. आम्ही शेवटच्या स्तरावरील व्यक्तीचे आर्थिक समावेशन साध्य करण्यासाठी आणि जी20 नेत्यांच्या निर्देशांनुसार भरपाईचा खर्च कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण पेमेंट प्रणालींसह नवोन्मेषी तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराला आणि सातत्यपूर्ण विकासाला देखील प्रोत्साहित करत आहोत. डिजिटल वित्तीय साक्षरता आणि ग्राहक संरक्षण बळकट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे देखील आम्ही समर्थन करतो. आम्ही जी20 2023 एफआयएपीला मान्यता देत आहोत जे व्यक्ती आणि एमएसएमईच्या आर्थिक समावेशनाला अतिशय जास्त वेगाने गती देण्यासाठी, विशेषतः जी20 देशातील आणि त्यापलीकडील देशातील जास्त असुरक्षित आणि अपात्र गटांसाठी  कृती केंद्रित आणि भविष्याचा विचार करणारा एक आराखडा उपलब्ध करून देत आहे. आम्ही 2023च्या अद्ययावत जीपीएफआय संदर्भ अटींचा देखील पुरस्कार करतो.

25. आम्ही फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या(FATF) आणि एफएटीएफ शैलीच्या प्रादेशिक संस्थांच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांची पूर्तता करण्याच्या महत्त्वाला मान्यता देत आहोत. साधनसंपत्तीच्या त्यांच्या वाढत्या गरजांना पाठबळ देण्यासाठी आणि परस्पर मूल्यांकनाच्या पुढील फेरीसह इतरांनाही तसेच करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही  कायदेशीर व्यक्ती आणि कायदेशीर व्यवस्थेच्या फायदेशीर मालकीच्या पारदर्शकते विषयीच्या सुधारित एफएटीएफ मानकांच्या वेळेवर आणि जागतिक अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहोत जेणेकरून गुन्हेगारांना  लपणे आणि अवैध लाभ देणारे गैरव्यवहार करणे अवघड होईल. गुन्हेगारी रक्कम वसूल करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये वाढ करण्यासाठी एफएटीएफ कडून सुरू असलेल्या कार्याचे विशेषत: एफएटीएफ ने मालमत्ता वसुली आणि जागतिक मालमत्ता वसुलीचे जाळे बळकट करण्याच्या दिशेने केलेल्या प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. एफएटीएफ मानकांना अनुसरून आभासी मालमत्ताशीं संबंधित जोखीमा विशेषतः दहशतवादाला अर्थसाहाय्य, मनी लॉन्डरिंग आणि अर्थसाहाय्यातील जोखीमा कमी करण्यासाठी देशांकडून विकसित आणि अंमलबजावणी होत असलेल्या प्रभावी नियामक आणि देखरेख करणाऱ्या चौकटींच्या महत्त्वाचा आम्ही पुनरुच्चार करतो. या संदर्भात आम्ही एफएटीएफकडून प्रवासविषयक नियमासह तिच्या जागतिक मानकांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्यासाठीचे उपक्रम आणि विकेंद्रित अर्थसाहाय्य (DeFi)  व्यवस्था आणि पीअर टू पीअर व्यवहारांसह उदयाला येणारे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातून निर्माण होणाऱ्या धोक्यांसंदर्भातील तिचे काम यांचे समर्थन करतो. दहशतवादी कारवायांसाठी अर्थसाहाय्य करण्याकरिता क्राऊड फंडिंगचा वापर आणि सायबर फसवणुकीशी संबंधित मनी लाँडरिंग यावर एफएटीएफकडून सुरू असलेले काम पूर्ण होण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

26. महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार आम्ही  अर्थमंत्री आणि जी20 देशांच्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एका अशा भविष्यासाठी प्रयत्न करतो जिथे प्रत्येक देश झटत असेल, समृद्धीची व्यापक विभागणी होत असेल आणि मानवता आणि या ग्रहाचे कल्याण परस्परांशी तादात्म्याने गुंफलेले असेल.

 

परिशिष्ट I: यापुढील कामासाठी मुद्दे

जुलैमधील एफएमसीबीजी बैठकीनंतर विविध जी20 फायनान्स ट्रॅक वर्कस्ट्रीम्सकडून मिळालेल्या निष्कर्षांची यादी या परिशिष्टात आहे.

 

कार्यगट चौकट

बृहद आर्थिक अस्थिरता आणि वित्तीय जागतिकीकरणाशी संबंधित वाढत्या असुरक्षिततेच्या संदर्भात मजबूत, शाश्वत आणि समावेशक वृद्धीवरील जी20 आयएमएफ अहवाल, ऑक्टोबर 2023.

  

आंतरराष्ट्रीय वित्तीय वास्तुरचना कार्य गट

a.    एमडीबींच्या बळकटीकरणावर जी20 तज्ञ गटाच्या अहवालाचा खंड 2

एमडीबी, विषयतज्ञ आणि समभागधारक यांच्यासोबतच्या संवादासह सीएएफच्या रोलिंग बेसिसवर शिफारशींच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा नियमित आढावा

कोट्याच्या 16व्या सामान्य आढाव्याच्या प्रगतीबाबत आयएमएफकडून अद्ययावत माहिती                                                       

• 2021 एसडीआर वाटपाच्या वाटप-पश्चात मूल्यांकनाबाबत आयएमएफकडून अद्ययावत माहिती

सामान्यांसाठी वापर पुस्तिका साठी संधींचा सातत्याने शोध

 

पहिल्या प्रकरणांचा अनुभव सादर करणारी चौकट

जी20 आयएफए डब्लूजी जागतिक कर्जाच्या स्थितीबाबत न्याय्य आणि सर्वसमावेशक पद्धतीने जी20 दस्तावेज अतिशय झपाट्याने तयार करत राहणार.

आयएफए डब्लूजी सामान्य चौकटीच्या अंमलबजावणीशी संलग्न असलेल्या धोरणाशी संबंधित मुद्यांवरील चर्चा सुरू ठेवणार आणि योग्य त्या शिफारशी करणार.

कंपेअरिबिलिटी ऑफ ट्रीटमेंट(CoT) सारख्या विषयांवर जीएसडीआरच्या कार्यकक्षेंतर्गत तांत्रिक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार.

काही विशिष्ट कर्ज साधनांवरील चर्चा सुरू ठेवून सार्वभौम कर्जाच्या पुनर्रचनेत सुधारणा, ज्यामध्ये एलआयसींसाठी कोलॅटरल फायनान्सिंगच्या संभाव्य सर्वोत्तम पद्धतींचा म्हणजे खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या उपाययोजनांचा शोध, विशेषतः सांघिक कर्जांची पुनर्रचना, सामूहिक कृती कलमे, देश-खंड कर्ज साधनांमधील(SCDI) फायदे आणि गुंतागुंत आणि हवामान प्रतिरोधक आंतरराष्ट्रीय सार्वभौम कर्जरोखे आणि अधिकृत द्विपक्षीय कर्जे यांचे विश्लेषण यांचा समावेश असेल

सप्टेंबर 2023 मध्ये सीबीडीसीच्या व्यापक अंगिकाराच्या संभाव्य बृहद-आर्थिक परिणामांवरील आयएमएफ अहवाल.

 

पायाभूत सुविधा

सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध स्रोतांचा वापर करून जी20 सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये नियोजित पायाभूत सुविधा गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी इन्फ्राट्रॅकर 2.0 सुरु ठेवणे आणि त्याचे ऑनलाईन साधनामध्ये रुपांतर करणे.

जी20 अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील पायाभूत सुविधांशी संबंधित वाव आणि करांच्या अर्थव्यवस्थांचे एकीकरण.

 

शाश्वत वित्तीय कार्य गट

एसएफडब्लूजी ऑनलाईन डॅशबोर्डवरील जी20 शाश्वत वित्तीय आराखड्याच्या प्रगतीची देखरेख आणि वृत्तांकन.

जी20 शाश्वत वित्त अहवाल अंतिम करणे.

एसडीजींना अर्थसाहाय्यासाठी केस स्टडीजचे संकलन.

 

आंतरराष्ट्रीय कर आकारणी

सामाईक दृष्टीकोनाच्या माध्यमातून अंमलबजावणीसाठी ओईसीडीकडून स्तंभ दोनवरील एक हँडबुक विशेषतः क्षमतांची मर्यादा असलेल्या अधिकारक्षेत्रांना मदत करण्यासाठी आणि ऑक्टोबर 2023 पर्यंत हँडबुक सादर करण्यासाठी.

 

वित्तीय क्षेत्रातील मुद्दे

क्रिप्टो मालमत्तेबाबत  बृहद-आर्थिक आणि नियामक दृष्टीकोनाचे एकात्मिकरण करणारा सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावयाचा आयएमएफ आणि एफएसबीचा संयुक्त विश्लेषण अहवाल.

ऑक्टोबर 2023 मध्ये जलद पेमेंट प्रणाली(FPS) परस्परांशी जोडणारे शासन, जोखीम व्यवस्थापन आणि देखरेखीबाबतचे विचार यावरील पेमेंट्स आणि बाजार पायाभूत सुविधा बीआयएस समितीचा (CPMI) अंतरिम अहवाल आणि सीमेपलीकडील पेमेंट्ससाठी ISO 20022 समानतेच्या आवश्यक बाबींवरील अंतिम

एफएसबी सप्टेंबर 2023 मध्ये एनबीएफआय मधील लाभाच्या आर्थिक स्थिरतेच्या परिणामांवर अहवाल देईल.

एफएसबी सप्टेंबर 2023 मध्ये एनबीएफआय ची प्रतिरोधकता वाढविण्याबाबत एकंदर प्रगती अहवाल देईल.

एफएसबी ऑक्टोबर 2023 मध्ये जागतिक आर्थिक स्थिरतेला चालना देण्यासाठी त्याचा वार्षिक अहवाल उपलब्ध करेल.

एफएसबी सीमेपलीकडील पेमेंट्स वाढवण्यासाठी जी20 आराखड्याच्या अंमलबजावणीवरील प्रगतीचा अहवाल ऑक्टोबर 2023 मध्ये देईल.

एफएसबी, आयएसएसबी आणि IOSCO च्या समन्वयाने, ऑक्टोबर 2023 पर्यंत हवामान-संबंधित आर्थिक निष्कर्षांवरील  अधिकार क्षेत्र आणि फर्म्सच्या प्रगतीचा अहवाल तयार करेल.

जीपीएफआय नॅशनल रेमिटन्स प्लॅन्सचे दुसरे अद्ययावतीकरण पूर्ण करण्यासाठी आणि रेमीटन्सेसच्या खर्चात कपात करण्यामध्ये डिजिटल रेमीटन्सच्या प्रभावावरील केस स्टडीचा अहवाल सादर करण्यासाठी काम सुरू ठेवेल.

डिजिटल वित्तीय समावेशनाच्या जी20 जीपीएफआय उच्च स्तरीय सिद्धांतांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीची जीपीएफआय माहिती देईल.

जीपीएफआय एसएमई लिव्हिंग डेटाबेसवर आधारित एसएमई वित्तपुरवठ्यामधील सामान्य मर्यादांवर मात करण्यासाठी एसएमई सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण साधनांवर जीपीएफआय काम करेल.

***

Jaydevi PS/N.Chitale/S.Kane/R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941794) Visitor Counter : 257


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil