विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

गोव्यातील सीईएम14/एमआय 8 बैठकी दरम्यान केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाला भेट दिली, कमी कार्बन प्रधान अर्थव्यवस्थेला पूरक उपक्रमांचा केला शुभारंभ

Posted On: 22 JUL 2023 5:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी19 ते 22 जुलै 2023 या कालावधीत गोवा येथे आठव्या नवोन्मेष अभियानाअंतर्गत (एमआय-8) सुरु असलेल्या जी20 उर्जा स्थित्यंतरविषयक मंत्रीस्तरीय बैठक (ईटीएमएम)तसेच 14 व्या स्वच्छ उर्जा मंत्रीस्तरीय (सीईएम14) बैठकींच्या दरम्यान गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयममध्ये उभारण्यात आलेल्या तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनामध्ये असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विविध संशोधन तसेच विकास केंद्रांतील सहभागींशी त्यांनी चर्चा केली.

हे तंत्रज्ञानविषयक प्रदर्शन पुढील तीन भागांमध्ये आयोजित करण्यात आले होते वाहने आणि चार्जिंग, पायाभूत सुविधाविषयक प्रदर्शन (सियाम टेरी,कॅलस्टार्ट आणि ड्राईव्ह झिरो), नवोन्मेष अभियान (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित) आणि स्वच्छ तांत्रिक स्टार्ट अप (टेरी). यामध्ये भारतातील अत्याधुनिक घडामोडींबरोबरच, विविध क्षेत्रांतील नवी तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञाने सादर करण्यात आली आणि त्यातून प्रेक्षकांना स्वच्छ उर्जाविषयक अद्वितीय अनुभव देण्यात आला. देशभरात पसरलेल्या संशोधन आणि विकास केंद्रांनी आणि संस्थांनी शोधलेली तंत्रज्ञाने आणि नवोन्मेष यांचे प्रदर्शन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सादर केले. सदर प्रदर्शन हा स्वच्छ उर्जा विषयक मंत्रीस्तरीय आणि नवोन्मेष अभियानाच्या बैठकींचा महत्त्वाचा घटक होता.

मंत्रीस्तरीय बैठकीच्या दिवशी, केंद्रीय मंत्री डॉ. सिंह यांनी स्वच्छ उर्जा अभियान जलदगतीने चालवण्यासाठी निधीविषयक संधी आणि अनुदाने देखील जाहीर केली. यामध्ये नवोन्मेष अभियान 2.0 अंतर्गत कार्बन कॅप्चर वापर या क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यासाठी वित्तपुरवठा संधी घोषणा 2023 चा समावेश आहे. कार्बन डाय ऑक्साईड कॅप्चर, वेगळे करणे, साठवण आणि कार्बन डाय ऑक्साईड मूल्यवर्धन या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानांना ओळखून  प्राधान्य देणे तसेच या क्षेत्रात भारताची प्रगती लक्षात घेणे यासाठी एमआय सदस्य देशांसह संयुक्त संशोधन आणि विकास कार्य हाती घेण्याचा देखील समावेश आहे.

त्याखेरीज, केंद्रीय मंत्र्यांनी या वेळी, स्वच्छ उर्जा साठवण आणि हरित हायड्रोजन या क्षेत्रातील राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेत्यांना/ अनुदानपात्र सहभागींना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांनी हरित उर्जेवर आधारित भविष्यकालीन अभियानाअंतर्गत निश्चित केलेल्या सर्वात तातडीच्या नवोन्मेष प्राधान्य क्रमाचे नमुने आणि उच्च क्षमतेच्या पीव्ही सेल्स यावरील राष्ट्रीय ग्रांट प्रकल्प स्पर्धेच्या विजेत्यांचा देखील गौरव केला.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी नवोन्मेष अभियान तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. या प्रदर्शनात कमी कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल होण्यास मदत करण्यासाठी सीसीयुएस, हायड्रोजन, स्मार्ट ग्रीड्स, उर्जा कार्यक्षमता उभारणी, ऑफ-ग्रीड्स आणि अशाच इतर क्षेत्रांमध्ये डीएसटीच्या आधारे एमआय उपक्रमांच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञानांचे सादरीकरण करण्यात आले.

***

M.Pange/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941782) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu