श्रम आणि रोजगार मंत्रालय
जागतिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत, जी-20 श्रम आणि रोजगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक इंदूर इथे संपन्न - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
Posted On:
21 JUL 2023 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 21 जुलै 2023
जी-20च्या तीन निष्कर्ष दस्तावेजांचा एकमताने स्वीकार करत जी-20 श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीचा इंदूर इथे यशस्वी समारोप झाला. जागतिक पातळीवर कौशल्यांतील तफावत दूर करण्यासाठीच्या धोरणांबाबत जी 20 धोरणात्मक प्राधान्यक्रम, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी पुरेशा आणि शाश्वत सामाजिक सुरक्षा आणि मानाने काम करण्यासाठीचा जी 20 धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि सामाजिक सुरक्षिततेसंदर्भात शाश्वत वित्त पुरवठ्यासाठीचे जी 20 धोरणात्मक पर्याय हे ते तीन दस्तावेज आहेत. सदस्य देशांच्या प्रमुखांना या दस्तावेजांबाबत विचारविमर्श करण्यासाठी हे दस्तावेज नवी दिल्ली जी20 प्रमुखांच्या घोषणापत्र 2023 मध्ये संलग्न करण्यात येणार आहेत. सदर बैठकीत मंत्र्यांनी निष्कर्ष दस्तावेज आणि सारांश यांचा स्वीकार केला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या या बैठकीमुळे जगातील सलोखा आणखी दृढ करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. ते म्हणाले की, महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून जी20 देशांनी भूराजकीय मुद्द्यांवरील एक परिच्छेद वगळता इतर सर्व मुद्द्यांवर एकमत मिळवण्यासाठी भारतीय नेतृत्वाचे समर्थन केले आणि त्यासाठी अध्यक्षांकडून सारांश जारी करण्यात आला. केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की, भारताच्या अध्यक्षतेखाली, जी 20 देशांनी ‘बहुपक्षवादासाठी आदर’, ‘संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील उद्देश तसेच तत्वांचा आदर’ या मुद्द्यांचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘आजचे युग हे युद्धाचे युग असता कामा नये’ या संकल्पनेचा संदर्भ समाविष्ट करण्यास संमती दिली. सर्व कामगारांना चांगले काम आणि कामगार हिताचे फायदे मिळावेत या जी20 सदस्य देशांच्या प्रतिबद्धतेचा हा पुरावा आहे असे ते म्हणाले.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941612)
Visitor Counter : 155