राष्ट्रपती कार्यालय

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted On: 21 JUL 2023 6:55PM by PIB Mumbai

 

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी आज (21 जुलै, 2023) नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती विक्रमसिंघे यांचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या  की, भारताच्या 'शेजारी प्रथम ' धोरणात आणि सागर (Security and Growth of All in the Region) दृष्टिकोनामध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या कीगेल्या एका वर्षात श्रीलंकेला आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताने दिलेला बहुआयामी पाठिंबा हा श्रीलंकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा दाखला  आहे.  श्रीलंकेच्या गरजेच्या वेळी भारत नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भविष्यातही भारत असाच पाठिंबा आणि मदत करत राहील यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आमची भागीदारी  दोन्ही देशांच्या सामान्य लोकांसाठी आणि हिंद महासागर क्षेत्रासाठी चिरस्थायी आणि लाभदायक आहे.

भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहेत आणि भारत-श्रीलंका विकासात्मक भागीदारीमुळे श्रीलंकेच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेसोबतची विकासासंबंधित भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941578) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil