नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क्स

Posted On: 21 JUL 2023 3:27PM by PIB Mumbai

 

सागरमाला कार्यक्रमात लॉजिस्टिक पार्कचे 13 प्रकल्प समाविष्ट आहेत. परिशिष्टात या 13 प्रकल्पांचा तपशील जोडला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, प्रमुख बंदरे आणि राज्य सरकारे यांनी हे प्रकल्प  हाती घेतले आहेत.

भारतमालाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे 35 मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क्स विकसित करत आहे. त्यापैकी 6 पार्क हे MoRTH ने  कोचीन (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)  मुंबई (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल), आणि कांडला (गुजरात) या बंदरांच्या शहरांमध्ये हाती घेतले आहेत.

याशिवाय, स्थिर  जेटींना  निश्चितपणे  किफायतशीर आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पर्याय देऊ शकतील अशा  फ्लोटिंग जेटींच्या विकासासाठी मंत्रालयाने देशभरातील 50 ठिकाणे निश्चित केली आहेत.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ग्रामीण विकास मंत्रालयाच्या समन्वयाने किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यात 5000 हून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे. विशाखापट्टणम आणि मुंबई येथे मंत्रालयाने सागरी आणि जहाज बांधणी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले आहे जिथे 6000 हून अधिक उमेदवारांचे प्रशिक्षण झाले आहे.

Annexure: List of logistics parks projects included in Sagarmala

Sr. No.

Name of Project

State

1

New ICD Development in South Uttarakhand -MMLP Pantnagar

Uttarakhand

2

New ICD Development in Raipur -MMLP Naya Raipur

Chhattisgarh

3

New ICD Development in Jharsuguda

Odisha

4

Phase II of Multi Model Logistics Hub - Visakhapatnam Port

Andhra Pradesh

5

New ICD Development in Hyderabad -MMLP Nagulapally

Telangana

6

Dry Port at Niphad in Nashik District

Maharashtra

8

Dry Port at Ranjani Village in Sangli district

Maharashtra

9

New ICD development in Rajasthan -MMLP Swarupganj

Rajasthan

10

Multi Modal Logistics Park at Paradip Port

Odisha

11

New ICD Development in North Bengal -Darjeeling

West Bengal

12

Dry Port at Wardha

Maharashtra

13

Dry Port at Jalna

Maharashtra

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Kane/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941434) Visitor Counter : 183


Read this release in: English , Urdu , Tamil