भूविज्ञान मंत्रालय
भारतीय हवामान विभागाने उष्मा निर्देशांक केला प्रकाशित : किरेन रिजिजू यांनी दिली माहिती
उष्मा निर्देशांकामुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी लोकांनी घेण्याच्या अतिरिक्त काळजीबाबत मिळणार मार्गदर्शन
Posted On:
20 JUL 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच प्रायोगिक तत्त्वावर उष्मा निर्देशांक सुरू केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिली. राज्यसभेत एका लेखी उत्तरात याबाबत ते माहिती देत होते. देशाच्या ज्या भागात स्पष्ट तापमान/ उच्चसदृश तापमान (तापमानासह आर्द्रतेचा प्रभाव लक्षात घेऊन मोजलेले तापमान) जास्त असल्यामुळे तेथील लोकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागतो, अशा प्रदेशातील लोकांना स्वतःचा बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय हवामान विभागाने प्रायोगिक उष्मा निर्देशांकाचा प्रारंभ केला आहे. सध्या देशात अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवा, राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय व्यवस्थापन (NOAA) संस्थाद्वारे वापरल्या जाणार्या उष्मा निर्देशांक समीकरणाचा वापर करून उष्णता निर्देशांक काढला जातो.
उष्मा निर्देशांक उच्च तापमानावरील आर्द्रतेच्या प्रभावाविषयी माहिती देतो, सोबतच मानवाला उच्च तापमान सदृश अनुभव प्रदान करतो. हा अनुभव मानवी अस्वस्थतेचा संकेत म्हणून वापरला जाऊ शकतो, असे रिजिजू यांनी सांगितले. मानवी अस्वस्थता कमी करण्यासाठी घ्यावयाच्या अतिरिक्त काळजीबद्दल हा निर्देशांक मार्गदर्शन करतो, असेही ते म्हणाले.
रिजिजू यांनी सांगितलेले प्रायोगिक उष्णता निर्देशांकासाठी वापरले जाणारे वर्ण संकेत खालीलप्रमाणे आहेत:
हिरवा:- प्रायोगिक उष्णता निर्देशांक 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी.
पिवळा : - प्रायोगिक उष्णता निर्देशांक 36 ते 45 अंश सेल्सिअस.
नारंगी :- प्रायोगिक उष्णता निर्देशांक 46 ते 55 अंश सेल्सिअस.
लाल : - प्रायोगिक उष्णता निर्देशांक 55 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त.
हा उष्मा निर्देशांक आंध्र प्रदेशासह संपूर्ण देशात केवळ प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जात असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. तसेच, उष्मा कृती योजनेअंतर्गत, भुवनेश्वर आणि अहमदाबादसाठीचा उष्मा निर्देशांक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा (NDMA) द्वारे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था (IIPH) यासारख्या स्थानिक संस्थांच्या सहकार्याने, प्रकल्प पद्धतीने पूर्ण केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941128)
Visitor Counter : 179