संरक्षण मंत्रालय
लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारतीय-रशियन आंतरसरकारी आयोगाच्या लष्करी सहकार्यासंबंधी कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचा नवी दिल्लीत समारोप
Posted On:
19 JUL 2023 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील भारतीय-रशियन आंतरसरकारी आयोगाच्या लष्करी सहकार्यासंबंधी कार्यगटाची तिसरी बैठक 18 - 19 जुलै 2023 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे झाली.
लेफ्टनंट जनरल जॉन्सन पी मॅथ्यू, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू चेअरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी (CISC), HQ - IDS आणि रशियन महासंघाच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या मुख्य परिचालन संचालनालयाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल डायलेव्हस्की इगोर निकोलाविच यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.
दोन्ही देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या संरक्षण गुंतवणुकीच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. तसेच विद्यमान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य यंत्रणेच्या कक्षेत नवीन उपक्रमांबाबत विचार करण्यात आला.
कार्यगटाची ही बैठक मुख्यालय, एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्याचे मुख्य संचालनालय यांच्यात धोरणात्मक आणि परिचालन स्तरावर नियमित चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी स्थापन केलेला एक मंच आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940846)
Visitor Counter : 160