विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी गोव्यात स्वच्छ ऊर्जा मंत्रालयाच्या (सीइएम-14) 8 व्या मिशन इनोव्हेशन बैठकीला आभासी पद्धतीने केले संबोधित

Posted On: 19 JUL 2023 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जुलै 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज गोव्यात स्वच्छ ऊर्जा मंत्रालयाच्या (सीइएम-14) 8व्या मिशन इनोव्हेशन  बैठकीत मार्गदर्शन केले.  या बैठकीत 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परवडणाऱ्या स्वच्छ ऊर्जा उपायांचे आवाहन सिंह यांनी यावेळी केले. स्वच्छ ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यासाठी, मजबूत सार्वजनिक खाजगी भागीदारी ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

2018 मध्ये क्लीन एनर्जी इंटरनॅशनल इनक्यूबेशन सेंटर (सीइआयआयसी)ची स्थापना झाली. या सेंटरने 45 स्टार्टअप्स सुरू केली आहेत आणि त्यांनी आधीच 35 पेटंट दाखल केली आहेत, असे त्यांनी सांगितले. 10 स्टार्टअप्सनी त्यांच्या उत्पादनांचे व्यावसायिकीकरण केले आहे आणि काही स्टार्टअप्सनी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा निधी जमा केला आहे. तर यापैकी 20 स्टार्टअप्स आता व्यावसायिकरित्या बाजारात उतरले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मिशन इनोव्हेशनच्या उदिद्ष्टांना अनुसरून इनक्युबेटर स्वच्छ ऊर्जा नवकल्पनांच्या विस्तृत पटाला समर्थन देतो असे त्यांनी सांगितले. इनक्युबेटरमुळे प्रगत प्रयोगशाळा आणि उपकरणे, तज्ञ आणि मार्गदर्शकांचा सेतू तयार करणे आणि प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या करण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे मुख्य परिसंस्थेतील घटकांचे जाळे, सीड फंड सपोर्ट आणि मोठ्या प्रमाणावरच्या गुंतवणुकीच्या संधी मिळतात, असेही ते म्हणाले.

सीईआयआयसीने सुरू केलेल्या ‘टेकाचार’ या स्टार्टअपला तंत्रज्ञानातील नवोपक्रमासाठी जीबीपी 1 मिलियन अर्थ शॉट पारितोषिक विजेता म्हणून जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940729) Visitor Counter : 112