वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने 'रेझिन ट्रिटेड कॉम्प्रेस्ड वुड लॅमिनेट' आणि 'घरगुती वापरासाठीचे इन्सुलेटेड फ्लास्क, बाटल्या आणि कंटेनर' साठी गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित केले
Posted On:
19 JUL 2023 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) ने 14 जुलै 2023 रोजी 'रेझिन ट्रिटेड कॉम्प्रेस्ड वुड लॅमिनेट' आणि 'घरगुती वापरासाठीचे इन्सुलेटेड फ्लास्क, बाटल्या आणि कंटेनर' साठी 2 नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित केले. हे गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचनेच्या तारखेपासून सहा महिन्यांसाठी लागू राहतील. भारतात गुणवत्तापूर्ण परिसंस्थेच्या विकासासह, हे गुणवत्ता नियंत्रण आदेश सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहकांची सुरक्षितता देखील सुनिश्चित करतील.
‘रेझिन ट्रिटेड कॉम्प्रेस्ड वुड लॅमिनेट’ साठी गुणवत्ता नियंत्रण आदेशात देशांतर्गत बाजारपेठेसाठी उत्पादित केलेल्या किंवा भारतात आयात केलेल्या उत्पादनांसाठी ‘इलेक्ट्रिकल, रासायनिक आणि सामान्य हेतूंसाठी रेझिन ट्रिटेड कॉम्प्रेस्ड वुड लॅमिनेट (कॉम्प्रेग्स)’ साठी आयएस मानक अंतर्गत प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे.
'घरगुती वापरासाठी इन्सुलेटेड फ्लास्क, बाटल्या आणि कंटेनर' साठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशात देशांतर्गत बाजारपेठेसाठी उत्पादित किंवा भारतात आयात 'घरगुती वापरासाठी इन्सुलेटेड फ्लास्क', 'घरगुती स्टेनलेस स्टील व्हॅक्यूम फ्लास्क/बाटली' आणि 'अन्न साठवण्याच्या इन्सुलेटेड कंटेनर ' उत्पादनांसाठी आयएस मानकांअंतर्गत प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे .
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) मानके हे ऐच्छिक स्वरूपाची असून, गुणवत्ता नियंत्रण आदेश ही एक अनिवार्य प्रमाणीकरण योजना आहे, ज्याद्वारे संबंधित उत्पादनाला लागू होणाऱ्या भारतीय मानकांच्या निर्दिष्ट सूचीचे पालन केंद्र सरकारद्वारे अनिवार्य केले जाते. गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित करण्याचे उद्दिष्ट भारतात दुय्यम उत्पादनांच्या आयातीला आळा घालणे, अनुचित व्यापार पद्धतींना प्रतिबंध करणे आणि मानवी, प्राणी किंवा वनस्पतींचे आरोग्य आणि पर्यावरण यांच्या सुरक्षेसाठी देशांतर्गत उत्पादित उत्पादनांचा दर्जा वाढवणे हे आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940696)
Visitor Counter : 128