वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग आणि एमएमएफ तयार वस्त्रे, एमएमएफ कापड आणि तंत्रज्ञान वस्त्र अशा क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू, नव्याने आवेदनपत्रे आमंत्रित
Posted On:
18 JUL 2023 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2023
उद्योग क्षेत्रातील हितसंबंधियांकडून आलेल्या विनंतीचा विचार करुन, वस्त्रोद्योग मंत्रालयाने, 31 ऑगस्ट 2023 पर्यंत, पीएलआय पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, वस्त्रोद्योग आणि एमएमएफ तयार वस्त्रे, एमएमएफ कापड आणि तंत्रज्ञान वस्त्र अशा क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत नव्याने आवेदनपत्रे आमंत्रित करण्यात आली आहेत.
या योजनेअंतर्गत, आधी जारी अधिसूचना आणि मार्गदर्शक तत्वे, यानुसार, सर्व अटी आणि शर्ती यावेळीही लागू राहणार आहेत.
आधीच्या अधिसूचना खालील प्रमाणे :
- पीएलआय-वस्त्र योजना राजपत्र अधिसूचना दिनांक 24 सप्टेंबर 2021
- 28 डिसेंबर 2021 रोजी पीएलआय-वस्त्रोद्योगासाठी योजना मार्गदर्शक तत्त्वे
- 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुरुस्ती राजपत्र अधिसूचना
- दुरुस्ती राजपत्र अधिसूचना दिनांक 09.06.2023
- दुरुस्ती मार्गदर्शक तत्त्वे दिनांक 09.06.2023
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940565)
Visitor Counter : 104