पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भारत-अमेरिका धोरणात्मक स्वच्छ उर्जा भागीदारीसंदर्भात मंत्रीस्तरीय संयुक्त निवेदन
Posted On:
18 JUL 2023 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2023
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी आणि अमेरिकेच्या उर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांच्यामध्ये आज नवी दिल्ली येथे भारत-अमेरिका धोरणात्मक स्वच्छ उर्जा भागीदारीविषयीची (एससीईपी) मंत्रीस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी द्विपक्षीय स्वच्छ उर्जा सहभागाचे गांभीर्यपूर्ण महत्त्व अधोरेखित करत या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय उर्जा सहकार्याचे वाढते महत्त्व लक्षात घेतले. तसेच या बैठकीत, उर्जा सुरक्षा मजबूत करण्यात,स्वच्छ उर्जाविषयक अभिनव संशोधनाच्या संधींची निर्मिती करण्यात, हवामान बदलाच्या समस्येवर उपाय शोधण्यात आणि रोजगार निर्मितीच्या संधी शोधण्यात एससीईपीने मिळवलेल्या यशाचाही उल्लेख केला. .
दोन्ही नेत्यांनी विश्वसनीय, किफायतशीर आणि स्वच्छ उर्जेच्या सुलभ उपलब्धतेला प्राधान्य देणारे न्याय्य, शिस्तबद्ध आणि शाश्वत उर्जा संक्रमण साध्य करण्याच्या दिशेने कार्य करण्याची वचनबद्धता नव्याने व्यक्त केली.
सरकारी-खासगी कृती दले, रिव्हर्स ट्रेड मिशन्स, मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील भारत-अमेरिका व्यापारी गोलमेज बैठका आणि इतर व्यावसायिक संवादांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांसह दोन्ही देशांतील निःकार्बनीकरणाला मदत करण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रांमधील सहकार्य आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने एससीईपीच्या पाच स्तंभांनी केलेल्या कार्याचे देखील दोन्ही देशांनी स्वागत केले.
प्रत्येक देशात उर्जा उपलब्धता, किफायतशीरपणा आणि उर्जाविषयक न्याय यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व दोन्ही देशांनी ठळकपणे मांडले.
वित्तपुरवठ्याबाबतचे सहयोगी संबंध कायम ठेवून आणि ई-वाहतूक क्षेत्रासाठी किफायतशीर दरातील आणि सुलभतेने मिळणाऱ्या डेट आणि इक्विटी अर्थ सहाय्य यांच्या माध्यमातून शून्य उत्सर्जन वाहने तसेच वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याला दोन्ही देशांच्या प्रमुखांनी दिलेल्या प्राधान्याचे मंत्र्यांनी स्वागत केले.
ही भागीदारी दोन्ही देशांसाठी विकासाच्या उत्तम दर सुनिश्चित करून निःकार्बनीकरणासाठी आवश्यक व्यापक दृष्टीचे प्रतिनिधित्व करते याचा दोन्ही मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. एससीईपी अंतर्गत हाती घेण्यात आलेले कार्य, नव्या आणि आशादायक भविष्यासाठीचा मार्ग सुकर करतील अशी अशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940550)
Visitor Counter : 154