ऊर्जा मंत्रालय

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या (ईटीडब्ल्यूजी) बैठकीचे 19-20 जुलै रोजी गोव्यात आयोजन

Posted On: 18 JUL 2023 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/गोवा, 18 जुलै 2023

 

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली चौथी ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक (ईटीडब्ल्यूजी) 19-20 जुलै 2023 रोजी गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.

चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे ईटीडब्ल्यूजीचे अध्यक्ष आणि सचिव पवन अग्रवाल असतील. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला, खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृतलाल मीणा हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या अंतर्गत सहा प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही प्राधान्य क्षेत्रे ऊर्जा संक्रमणाच्या विविध पैलूंवर आणि शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा विकासाच्या दिशेने जागतिक सहकार्य वाढविण्यावर भारताचे असलेले लक्ष दर्शवतात.

सहा प्राधान्य क्षेत्रे म्हणजे (I) तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करून ऊर्जा संक्रमण (II) ऊर्जा संक्रमणासाठी अल्प गुंतवणूकीत वित्तपुरवठा (III) ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी (IV) ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कमी कार्बन संक्रमण आणि जबाबदार वापर, (V) भविष्यासाठी इंधन आणि (VI) स्वच्छ ऊर्जेसाठी सार्वत्रिक सुलभता आणि न्याय्य, परवडणारी आणि सर्वसमावेशक ऊर्जा पारेषण. ही प्राधान्य क्षेत्रं आपली 'एक पृथ्वी' चे पर्यावरण रक्षण करण्यावर, आपल्या 'एक कुटुंब' या ध्येयाला अनुसरुन सुसंवाद निर्माण करण्यावर आणि 'एक भविष्य' यावर लक्ष केंद्रित करतात

गोव्यातील चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीतील चर्चा अनुक्रमे बेंगळुरू, गांधीनगर आणि मुंबईतील पहिल्या तीन बैठकांवर आधारित असेल, जेणेकरून न्याय्य आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणास समर्थन देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती, धोरणे आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन समोर ठेवले जातील आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. चौथ्या ईटीडब्ल्यूजी बैठकीतील महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा.

ईटीडब्ल्यूजी बैठकीला जोडूनच विविध साइड इव्हेंट्सचे आयोजन करण्यात आले आहे. 'ई-मोबिलिटीला गती देण्यासाठी धोरणे सक्षम करणे', 'सार्वत्रिक ऊर्जा सर्वांना सुलभरित्या मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणे', 'शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG7) साध्य करण्यासाठी DRE अनुप्रयोग', 'प्रगतीसाठी ड्राइव्ह' ऊर्जा कार्यक्षमतेत एकत्रीकरणाद्वारे ज्ञान आणि उपाय' आणि 'ग्लोबल साउथमध्ये पॉवरिंग प्रोग्रेस - सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी स्वच्छ ऊर्जा.' या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (बीईई) आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे 19-23 जुलै 2023 या कालावधीत गोव्यात स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय (सीईएम) 14 व्या बैठकीचे आयोजन केले आहे. सीईएम 14/एमआय-8 ची थीम 'स्वच्छ ऊर्जा एकत्र पुढे नेणे' अशी संकल्पना आहे.

सीईएम 14 / एमआय -8 मध्ये, स्वच्छ ऊर्जा विषयांवर लक्ष केंद्रित करून 80 पेक्षा अधिक साइड इव्हेंट्स आयोजित केले जात आहेत. जगभरातील प्रमुख व्यावसायिक आणि ऊर्जा नेते या बैठकांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. सीईएम 14/एमआय-8 अंतर्गत गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातील इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन आणि इतर स्वच्छ तंत्रज्ञानासारखे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान सादर केले जाईल आणि अभ्यागतांना एक अनोखा अनुभव मिळेल.

चौथी ईटीडब्ल्यूजी बैठक 20 जुलै 2023 रोजी संपणार आहे. ईटीडब्ल्यूजी बैठकांचा समारोप होणारी मंत्रिस्तरीय बैठक 22 जुलै रोजी गोव्यात पार पडणार आहे. मंत्रिस्तरीय बैठकीत जी-20 आणि इतर निमंत्रित देशांचे मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी होतील. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह जी-20 ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.  

भारताचे जी-20 अध्यक्षपद स्वच्छ ऊर्जेच्या संक्रमणात जागतिक सहकार्य बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे

 

S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1940435) Visitor Counter : 152