इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

येत्या 4-5 वर्षांत स्टार्टअप्सची संख्या 10 पट वाढेल : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर

प्रविष्टि तिथि: 16 JUL 2023 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2023

 

केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी युनिकॉर्न आणि स्टार्टअप्सच्या निर्मितीमध्ये भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकत या उद्योगांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, वेब 3 (Web3) आणि नाविन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कसा यशस्वीपणे प्रवेश केला याबाबत त्यांनी माहिती दिली. हैदराबादमध्ये जीआयटीओ (JITO) इनक्युबेशन इनोव्हेशन फाऊंडेशन (JIIF) च्या 6व्या स्थापना दिनी आणि गुंतवणूकदार/स्टार्टअप उद्योजकांच्या बैठकीत मंत्र्यांनी या उद्योगातील अग्रणी आणि इच्छुक तरुण उद्योजकांशी संवाद साधला. 

आपल्या भाषणात राजीव चंद्रशेखर यांनी वर्ष 2014 पासून भारताने सुरू केलेल्या परिवर्तनाच्या कार्यावर भर दिला. प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि माहिती तंत्रज्ञानाशी संलग्न सेवांवर लक्ष केंद्रित करण्यापासून,पुढील 4-5 वर्षांमध्ये स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नसाठी लक्षणीय वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या 108 युनिकॉर्न पासून पुढील 4-5 वर्षांत आपण 10,000 पर्यंत पोहोचू असा विश्वास व्यक्त करत  ते म्हणाले की, आज भारतात एक लाखाहून अधिक स्टार्टअप्स आहेत आणि त्यात 10 पटीने वाढ होईल.

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कौशल्य विकास वाढविण्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्या समन्वित प्रयत्नांचीही प्रशंसा केली.

ते म्हणाले की, मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या उद्योगांसोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे, सरकार आता आवश्यक कौशल्ये ओळखण्यासाठी मिळून काम करत आहे, तसेच शैक्षणिक संस्था, संबंधित समुदाय आणि महानगरपालिका यांच्या सक्रिय सहभागासह एक व्यापक ढाचा निर्माण करत आहे.

आपण या उद्योगांसोबत सतत कार्य करत राहू त्याचबरोबर मोठ्या आणि छोट्या कंपन्यांसोबत भागीदारी काम करणे सुरू ठेवू असेही त्यांनी सांगितले. असे उद्योग आम्हाला आवश्यक कौशल्ये काय आहेत याबाबत माहिती देतात आणि ती लक्षात घेऊन सरकार नेटवर्क अकादमीद्वारे विकसित ढाचा  तयार करण्यासाठी भागीदारी करत आहे. स्टार्टअप उद्योगांसाठी संबंधित समुदाय आणि कॉर्पोरेट भागीदारी हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे घटक आहेत,” असे ही  मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1940010) आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Kannada