गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशातील प्रमुख विमानतळांसाठीच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांचा घेतला आढावा
देशातील झपाट्याने वाढणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमुळे उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मानके विकसित करण्याचे आणि उपलब्ध करण्याचे दिले निर्देश
गृह मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि इतर संस्थांनी देशातील प्रमुख विमानतळांवर सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाढ करण्याच्या दिशेने उचलली अनेक पावले
Posted On:
15 JUL 2023 8:33PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी देशातील प्रमुख विमानतळांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती. देशात झपाट्याने वाढत असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमुळे उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मानके विकसित करण्याचे आणि उपलब्ध करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. गृह मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि इतर संस्थांनी देशातील प्रमुख विमानतळांवर सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाढ करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत.
केंद्रीय गृह सचिव आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, केंद्रीय गुप्तचर संस्था, इमिग्रेशन संस्था, नागरी विमान वाहतूक सुरक्षा संस्था, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलआणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
***
M.Pange/ R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939885)
Visitor Counter : 167