आयुष मंत्रालय
सुश्रुत जयंतीनिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे तीन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
14 JUL 2023 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
सुश्रुत जयंतीनिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने 13-15 जुलै 2023 दरम्यान तीन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शल्यचिकित्सेचे जनक म्हणून ओळखले जाणारे शल्यविशारद सुश्रुत यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी सुश्रुत जयंती साजरी केली जाते. सुश्रुत यांचे महान व्यक्तिमत्त्व आणि शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या स्मरणार्थ, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा शल्यतंत्र विभागाने "शाल्यकॉन" या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
चर्चासत्रादरम्यान 13 आणि 14 जुलै रोजी शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक करण्यात आले. सत्राच्या पहिल्या दिवशी, सामान्य शस्त्रक्रिया प्रक्रिया आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसह नऊ थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिके करण्यात आली. यामुळे सहभागींना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रात्यक्षिके पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, एका शास्त्रीय सत्राच्या माध्यमातून संशोधक आणि तज्ञांना त्यांच्या ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सत्राच्या दुसऱ्या दिवशी 13 प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (भारतीय भूलतज्ज्ञ संस्था, वाराणसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शल्य तंत्र आणि भूलशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र 13 जुलै 2023 रोजी सुरू झाले असून ते उद्यापर्यंत चालणार आहे. या चर्चासत्राचा उद्देश सुश्रुत यांचे ज्ञान, त्यांची हुशारी आणि पद्धतींचा प्रचार करणे हा आहे. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील प्रगतीवर ज्ञानवर्धक चर्चा होत असून यात देशभरातील 180 सहभागींनी नोंदणी केली आहे.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939647)