गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत हिमाचल प्रदेश राज्य सरकारला आणखी 180.40 कोटी रुपये वितरीत करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली मंजुरी

Posted On: 14 JUL 2023 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

हिमाचल प्रदेशला अंतरिम  दिलासा  म्हणून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी  2023-24 या वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या  (एसडीआरिफ ) केंद्रीय हिश्या अंतर्गत  180.40 कोटी रुपयांचा अग्रीम दुसरा हप्ता  हिमाचल प्रदेशला जारी करण्यास मान्यता दिली.या राज्यातील बाधित लोकांना आधार देण्याच्या दृष्टीने तत्काळ स्वरूपाच्या मदत उपाययोजनांसाठी., केंद्र सरकारने 10 जुलै 2023 रोजी  हिमाचल प्रदेशला केंद्राच्या हिश्श्याचा 180.40 कोटी रुपयांचा पहिला हप्ता  वितरीत केला आहे.या निधीच्या वितरणामुळे  राज्य सरकारला यंदाच्या  पावसाळ्यात बाधित लोकांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्यास मदत होईल.

हिमाचल प्रदेशात अचानक  आलेला पूर/, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश राज्य सरकारला सर्व आवश्यक रसद आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 11  पथकांसह बचाव नौका आणि इतर आवश्यक उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. 1 पॅरा एसएफ  आणि 205 सैन्य हवाई दलाची   तुकडी नागरिकांना बाहेर काढून त्यांचे  स्थलांतर करण्यासाठी पाओंटा साहिब  येथे तैनात करण्यात आली आहे.  नागरिकांच्या स्थलांतरणासाठी  दोन एमआय -17व्ही5 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली  आहेत.

हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून सुरु असलेल्या मदत कार्याचे आणि परिस्थितीचे प्रत्यक्ष स्थळावरच मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथके (आयएमसीटी) देखील स्थापन केली  आहेत. आयएमसीटी17 जुलै 2023 पासून क्षेत्रीय दौरे करायला सुरुवात करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2023-24 या वर्षात 27 राज्यांना एसडीआरएफचा केंद्रीय हिस्सा म्हणून 10,031.20 कोटी रुपये यापूर्वीच वितरीत  केले आहेत.

  

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1939595) Visitor Counter : 128