आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी देहरादून येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले उद्‌घाटन

Posted On: 14 JUL 2023 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

"सर्वात मोठ्या लाभार्थी कल्याणासाठी योजना आखण्याचे उद्दिष्ट असलेली  आपली धोरणे अधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध राज्यांची मते , सर्वोत्तम पद्धती, मोलाचे  अनुभव आणि सूचनांचे आदानप्रदान करण्यासाठी 'स्वास्थ्य चिंतन शिविर' ही आरोग्यविषयक राष्ट्रीय बैठक उपयुक्त ठरते," असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. ते आज देहरादून  येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या 15 व्या संमेलनाच्या दोन दिवसीय, 'स्वास्थ्य  चिंतन शिविराचे' उद्‌घाटन करताना बोलत होते.

यावेळी  उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंग धामी, सिक्कीमचे मुख्यमंत्री  प्रेमसिंह  तमांग, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि प्रा. एस पी सिंह बघेल आणि नीती आयोग सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल, यावेळी उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. मनसुख मांडविया यांनी विचारविनिमयाचे महत्त्व अधोरेखित केले.हे चिंतन शिबीर  आपल्याला आरोग्य क्षेत्रातील विविध समस्या सखोलपणे जाणून घेण्याची  संधी देऊ शकेल,असे  ते म्हणाले.  भारतातील आरोग्यसेवेच्या भवितव्याबाबत त्यांनी विचार मांडले. या अमृत काळात , आपण आपल्या स्वतःच्या ज्ञानातून ‘प्रेरणा’ घेऊ आणि स्वतःचे आरोग्य प्रारूप  विकसित करू. कुष्ठरोग, क्षयरोग, सिकलसेल अॅनिमिया इत्यादी रोगांचे  विविध राज्यांमधून निर्मूलन करण्याचा  आणि पीएम-जेएवाय कार्डचा लाभ  राज्यांमध्ये अधिकाधिक व्हावा यासाठी  आपण संकल्प केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी सहभागींना त्यांच्या कल्पना सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित केले, जेणेकरून स्वास्थ्य  चिंतन शिविरातून सर्वोत्तम परिणाम मिळू शकतील. दोन दिवसांची ही बैठक  देशाला आरोग्यसेवाविषयक उपाय प्रदान करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल अशी आशा डॉ. मनसुख मांडविया यांनी यावेळी  व्यक्त केली.  

 

S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1939546)
Read this release in: English , Urdu , Nepali , Hindi , Tamil