कृषी मंत्रालय
कृषी सचिव मनोज आहुजा यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत बँकांसाठी "बँक्स हेराल्डिंग एक्सेलरेटेड रुरल अँड अॅग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन कॅम्पेन" नावाची नवीन मोहीम सुरू केली
Posted On:
12 JUL 2023 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2023
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांनी आज कृषि-पायाभूत सुविधा निधी अंतर्गत बँकांसाठी BHARAT (बँक्स हेराल्डिंग एक्सीलरेटेड रुरल अँड अॅग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन) नावाची नवीन मोहीम सुरू केली. 15 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी ही एक महिना चालणारी मोहीम असून या मोहिमेचे उद्दीष्ट 7200 कोटी रुपयांचा पल्ला गाठण्याचे आहे. दूर दृश्य प्रणाली द्वारे या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. या मोहिमेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक /अध्यक्ष, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, बँक नसलेल्या वित्तीय संस्था आणि निवडक सहकारी बँका यांचा समावेश होता. यात 100 हून अधिक बँक अधिकारी सहभागी झाले होते. बँक अधिकारी आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, कृषि पायाभूत सुविधा निधी(AIF) चे संयुक्त सचिव सॅम्युअल प्रवीण कुमार यांनी या महत्त्वाकांक्षी मुख्य योजनेच्या सुरुवातीपासून झालेल्या प्रगतीला अधोरेखित केले. आपल्या स्वागतपर भाषणात, त्यांनी या योजनेला चालना देण्यासाठी बँकांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ज्यामुळे देशात 31, 850 पेक्षा जास्त कृषी पायाभूत प्रकल्पांची निर्मिती झाली आहे. ज्यात 24750 कोटी AIF अंतर्गत असलेल्या कर्जाच्या रकमेसह 42,000 कोटी चा खर्च अपेक्षित आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि AIF च्या प्रकल्प देखरेख युनिटकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त करून, बँकांच्या सहभागी अधिकाऱ्यांनी AIF योजना नवीन उंचीवर नेण्यासाठी अनेक सूचना मांडल्या. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक आणि पंजाब ग्रामीण बँक या विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या बँकांचे, त्यांच्या योगदानातील प्रशंसनीय प्रयत्नाबद्दल कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी अभिनंदन केले. त्यांनी ही योजना पुढे नेण्यासाठी आणि आपल्या देशातील कृषी पायाभूत प्रकल्पांची प्रचंड क्षमता लक्षात घेऊन सर्व बँकांना लक्ष्य साध्य करण्याचे आवाहन केले. सर्व बँकांना या योजनेंतर्गत तयार केलेल्या प्रकल्पांच्या प्रभावाचे योग्य मूल्यमापन करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939092)
Visitor Counter : 193