नौवहन मंत्रालय

सागरी क्षेत्राला मजबुती देण्यासाठी तयार केलेल्या ‘सागर संपर्क’ या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन


भारतात तयार करण्यात आलेली ही प्रणाली जहाजांना सुरक्षित नौकानयनासाठी अधिक अचूक माहिती पुरवेल

देशात सहा ठिकाणी ‘सागर संपर्क’ या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे कार्य सुरु झाल्यामुळे सागरी दिशादर्शनामध्ये रेडीओ एड क्षेत्रात डीजीएलएलची कार्यक्षमता वाढेल : केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

Posted On: 12 JUL 2023 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

सागरी क्षेत्रात डिजिटल उपक्रमांचा समावेश करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ‘सागर संपर्क’ या सागरी क्षेत्राला मजबुती देण्यासाठी तयार केलेल्या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे (डीजीएनएसएस) उद्घाटन केले. डीजीएनएसएस ही भूआधारित सुधारणा यंत्रणा असून ती जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील काही त्रुटी तसेच अचूकतेतील अभावांची दुरुस्ती करून  स्थितीविषयक अधिक अचूक माहिती मिळण्याची सोय करते.  

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने दिशादर्शनविषयक सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले आहे, विशेषतः नजीकच्या भूतकाळात नौकानयनाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असल्याने याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. ते म्हणाले की, ‘डीजीएलएलच्या अधिपत्याखाली देशात सहा ठिकाणी ‘सागर संपर्क’ या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे (डीजीएनएसएस) कार्य सुरु झाल्यामुळे सागरी दिशादर्शनामध्ये रेडीओ एड क्षेत्रात डीजीएलएलची कार्यक्षमता वाढेल.’

डीजीएनएसएस ही सुविधा नाविकांना सुरक्षित दिशादर्शनासाठी मदत करेल आणि बंदरे तसेच बंदरांच्या आसपासच्या परिसरात जहाजांची एकमेकाशी टक्कर होणे, ग्राउन्डींग आणि अपघात यांचा धोका कमी करेल. यामुळे सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने जहाजांची ये-जा होऊ शकेल.

नौवहन क्षेत्रात पुनर्भांडवलीकरण आणि जीपीएस आणि जागतिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली (जीएलओएनएएसएस) सारख्या बहुविध उपग्रहाधारित प्रणालींचा वापर करुन झाल्यानंतर आता डीजीएनएसएस या प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माहितीची उपलब्धता आणि अनावश्यक माहितीचा भडीमार टाळणे यात वाढ होईल.तसेच नाविकांना 5 मीटरच्या परिघात त्यांच्या जहाजाची स्थिती व्यवस्थित राखण्यात मदत होईल.

अत्याधुनिक डीजीएनएसएस प्रणालीमुळे आता जीपीएस तसेच जीएलओएनएएसएस या प्रणालींकडून मिळालेल्या माहितीतील दुरुस्त्या प्रसारित करणे शक्य होईल. डीजीएनएसएस ही प्रणाली जीपीएस स्थाननिश्चिती मधील अचूकता लक्षणीय प्रमाणात वाढवते तसेच  वातावरणामुळे निर्माण होणारे अडथळे, उपग्रहांच्या घड्याळातील वेळेचा ओघ आणि इतर घटकांमुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी कमी करते. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिसिव्हर्स आणि आधुनिक सॉफ्टवेअर यांच्या मदतीने हे शक्य झाले आहे. या यंत्रणेमुळे त्रुटींच्या दुरुस्तीमधील अचूकता 5 ते 10 मीटर अंतरापासून सुधारून भारतीय सागरकिनाऱ्यांपासून 100 नॉटिकल मैल परिसरात 5 मीटरहून कमी अंतरावर आणण्यात यश आले आहे.    

 

 

 S.Patil/S.Chitnis/P.Malandkar(Release ID: 1939065) Visitor Counter : 120