कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी श्रीनगर येथे बँकर्स जागरूकता कार्यशाळेचे केले उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2023 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज श्रीनगर येथे बँकर्स जागरूकता कार्यशाळेचे उद्घाटन केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसाठी श्रीनगर मधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या हिवाळी सभागृहामध्‍ये पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग (DoPPW) द्वारे  दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेचा उद्देश पेन्शन वितरणासंबंधित विविध नियम आणि प्रक्रियांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य बँकांच्या वतीने करण्‍यात येत आहे.  पेन्शनधारकांसाठी "ईज ऑफ लिव्हिंग"  सुनिश्चित करण्यासाठीही   सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत.

यावेळी बोलताना डॉ. सिंह  यांनी श्रीनगर येथे कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचे  अभिनंदन केले. ते म्हणाले की, सध्याच्या काळात सेवेत असलेल्यांपेक्षा पेन्शनधारकांची संख्या जास्त असून हे सरकारसाठी आव्हानात्मक काम आहे.

ते म्हणाले की, सध्याचे सरकार निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्यात आले आहेत, ही  वस्तुस्थिती आता सर्वांच्या लक्षात आलीच आहे.  पेन्शन सुधारणांच्या बाबतीत जी पोकळी निर्माण झाली होतीती आता भरून निघाली आहे, असेही मंत्री म्हणाले.

सिंह म्हणाले की, ‘फेस रेगनिशन’ म्हणजेच चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आता आले आहे, त्यावेळेपासून  आतापर्यंत 37 लाखांहून अधिक  डिजिटल जीवन प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा  पेन्शनधारकांनाही  फायदा मिळावा यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

मंत्री म्हणाले की, ‘फेस रेगनिशन’ म्हणजेच चेहरा ओळखणाऱ्या  तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र  जारी करण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये देशव्यापी मोहीम सुरू केली जाईल आणि त्याबाबतच्या तपशिलांवर सध्या काम केले जात आहे. ते म्हणाले की, या मोहिमेत देशभरातील 100 हून अधिक शहरांचा समावेश असेल.

 

 S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1938528) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi