मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

महाबलीपुरम ह्या ऐतिहासिक शहरात राष्ट्रीय मत्स्योत्पादक दिन कार्यक्रम - 2023 साजरा


मत्स्यव्यवसाय क्षेत्रात स्टार्ट अप कंपन्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांची परशोत्तम रूपाला यांनी दिली माहिती

Posted On: 10 JUL 2023 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान, मत्स्यव्यवसाय, पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांनी आज महाबलीपुरम या ऐतिहासिक शहरात मत्स्य व्यवसाय स्टार्टअप प्रदर्शनाचे उद्घाटन केले.मत्स्यपालन क्षेत्रात, सर्वोत्तम अभिनव उपक्रम राबवणाऱ्या देशभरातील सुमारे 12 वैशिष्ट्यपूर्ण स्टार्टअप्सना  या प्रदर्शनाने एक मोठा मंच उपलब्ध करुन दिला आहे.  राष्ट्रीय मत्स्योत्पादक दिन-2023 चा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, मत्स्यव्यवसाय विभागाचे संयुक्त सचिव, सागर मेहरा  यांनी केले. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामगिरीचे प्रदर्शन तसेच 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या 138.13 कोटी रुपयांच्या 176 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे आभासी उद्घाटन करण्यात आले. ह्या प्रकल्पाचा लाभ, 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील तळागाळातील सुमारे 15,000 मत्स्योत्पादकांना होईल. केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित विविध मान्यवरांनी आभासी पद्धतीने, विविध योजनांचे लाभार्थी, जसे की मत्स्योत्पादक, मच्छीमारांशी संवाद साधला.

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील लाभार्थ्यांनी  त्यांचे आपल्या प्रदेशातील अनुभव परशोत्तम रुपाला यांना सांगितले  तसेच त्यांच्या समस्याही मांडल्या. त्याशिवाय, तसेच पीएमएमएसवाय योजना आणि केसीसी यामुळे, मच्छीमार आणि मत्स्योत्पादकांच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या विविध बदलांची त्यांना माहिती दिली.

मत्स्यव्यवसाय विभागाने स्टार्टअप इंडिया हब आणि डीपीआयआयटी यांच्या भागीदारीत ‘फिशरीज स्टार्टअप ग्रँड चॅलेंज’ ची घोषणा केली आहे.  मत्स्यपालन व्यवस्थेत विशेष प्रभाव निर्माण करणाऱ्या स्टार्टअप्सना शोधणे, त्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांना त्याबद्दल पुरस्कृत करणे, असे या या स्पर्धेचे उद्देश होते. ह्या स्पर्धेसाठी 121 स्टार्ट अप कंपन्यांनी अर्ज केले होते. सगळ्या कंपन्यांच्या कामांचे कठोर मूल्यमापन केल्यावर, 12 स्टार्ट अप्सची विजेते म्हणून निवड करण्यात आली.

फिशरीज स्टार्टअप ग्रँड चॅलेंज’ च्या विजेत्यांचा परशोत्तम रुपाला यांनी सत्कार केला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या  नवकल्पनांनुसार कार्य  करणे सुरू ठेवता यावे, यासाठी   2 लाख रूपये  रोख  पुरस्कार म्हणून देण्‍यात आले.

यावेळी परशोत्तम रुपाला यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील स्टार्टअप्सनी घेतलेल्या पुढाकारांचे मूल्यांकन केले. पीएमएमएसवाय उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे  आधुनिक त्याचबरोबर  वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून मत्स्योत्पादन घेणे आणि उत्पादकता वाढविण्यासाठी भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झाला असल्याचे सांगितले. मासेमारी आणि मत्स्यपालन यामुळे मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न तर वाढले आहेचयाशिवाय बाजारात माशांची उपलब्धताही वाढत असल्यामुळे अन्न सुरक्षा आणि पोषण यावर सकारात्मक परिणाम होईल, असे ते म्हणाले.

पुढे, बोलताना पीएमएमएसवाय योजनेमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात, देशाच्या आर्थिक वाढ आणि विकासात योगदानासह मत्स्य उत्पादन आणि प्रक्रिया या दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. यासाठी  लाभार्थींनी स्वत:हून  पुढे यावे, अशी  विनंती त्यांनी केली. केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड चा फायदा मत्स्यपालनासाठी आणि संबंधित कामांसाठी  करून घेतला जावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशभरातील मच्छिमारांना त्यांचे जीवनमान उंचवता यावे, यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत  करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतंत्र मत्स्य विभागाची स्थापना केली, अशी माहिती मंत्री परशोत्तम  रूपाला यांनी यावेळी दिली. 1950 ते 2014 पर्यंत मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सुमारे 3,681 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.  2014 पासून सरकारने अंदाजपत्रकामध्‍ये निधीची  तरतूद  करून  पीएमएमएसवाय , एफआयडीएफ  आणि इतर योजना सुरू केल्या. मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या प्रत्यक्षात गरजा नेमक्या काय आहेत, हे वास्तव जाणून घेऊन या क्षेत्राच्या विकासासाठी  32,000 कोटी रूपयांची एकूण गुंतवणूक  करण्यात आली आहे. तसेच, ‘रिपोर्ट फिश डिसीज ऍप (आरएफडी ) लाँच केल्याची माहिती दिली. यामुळे  शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील मासे, कोळंबी आणि कालवं यांच्यावर होणाऱ्या  रोगांच्या प्रादुर्भावाची माहिती मिळू शकते.  फील्ड-स्तरीय अधिकारी आणि मत्स्यरोग तज्ञांबरोबर  आवश्यकतेनुसार चर्चा करण्यास  या अॅपमुळे मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांना माशांना होणाऱ्या रोगराईच्या संकटाचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे; तसेच  वैज्ञानिक सल्ला मिळण्यास मदत होईल.  

 

S.Patil/R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938522) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil